श्रीरामपूर:-विमा क्षेत्रातील आंतर राष्ट्रीय पुरस्कार राहुल वाघ यांना प्रदान.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
विमा क्षेत्रातील आंतर राष्ट्रीय पुरस्कार राहुल वाघ यांना प्रदान.
श्रीरामपूर ( Rps स्टार न्युज ) भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या श्रीरामपुर शाखेतील विमा प्रतिनिधी राहुल वाघ यांना विमा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबदल तरुण विमा प्रतिनिधी म्हणुन आयुर्विमा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पुरस्कार सलग दुसऱ्या वर्षी प्राप्त झाला आहे तसेच 2022 – 23 या आर्थिक वर्षात द्विशतक वीर आणि 2021 – 22 या आर्थिक वर्षात शतक वीर विमा प्रातिनिधी होण्याचा बहुमान मिळाला आहे त्यांना आयुर्विमा महामंडळाचे विकास अधिकारी प्रवीण घोडे तसेच शाखेतील प्रशासकीय अधिकारी विकास अधिकारी आणि कर्मचारी यांचे सहकार्य लाभले . या यशाबद्दल त्यांचा आयुर्विमा महामंडळाचे पुणे विभागीचे वरिष्ठ मंडल प्रबंधक संदीप मोघे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला यावेळी उदय सुंदुबरेकर समीर टोपरे . विक्रेय मिलिंद शिरसाठ . शिवराज जाधव . प्रवीण घोडे आदीसह अधिकारी आणि पुरस्कार प्राप्त विमा प्रतिनिधी उपस्थित होते.