ताज्या घडामोडी

वैजापूर:-शासकीय मुलींच्या वस्तीगृहातील जेवणात कीडे आढळले – मुलींनी तहसीलदार यांना दिले निवेदन.

पत्रकार गजानन काळे छत्रपती छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघटक 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार गजानन काळे छत्रपती छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघटक

RPS STAR NEWS

शासकीय मुलींच्या वस्तीगृहातील जेवणात कीडे आढळले – मुलींनी तहसीलदार यांना दिले निवेदन.

वैजापूर- येथिल मागासवर्गीय मुलींच्या
शासकीय वसतिगृहात दिल्या जाणाऱ्या
जेवणात गुरुवारी किडे आढळून आल्याचा धक्का दायक प्रकार समोर आला . तसेच मुलींना दिल्या जाणाऱी फळे देखील खराब असल्याने मुलींनी जेवण न करता तहसिल कार्यालय गाठून
तहसीलदारांकडे केली आहे.

मागासवर्गीय ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणाची चांगली सोय व्हावी यासाठी वैजापूर येथे शिवराई रस्त्यावर शहराजवळ वस्तीगृह सुरू करण्यात आले आहे. या वस्तीगृहात ग्रामीण भागातील ७५ मुली राहतात. त्या मुलींना दररोज नाश्ता , जेवण व फळे दिले जातात. मात्र दिल्या जाणाऱ्या नाश्ता व जेवणात अनेक वेळा किडे आढळल्याची तक्रार वस्तीगृहातील मुलींनी अधिकाऱ्यांकडे केली होती.तसेच फळे देखील सडकी असतात. गुरूवारी सकाळी दिल्या जाणाऱ्या जेवणा मध्ये किडे व सडकी फळे स्पष्टपणे दिसत होते .हा प्रकार आढळून आल्यानंतर मुलीनी थेट वैजापूर तहसिल कार्यालय गाठले. वस्तीगह प्रशासनाविषयी रोष व्यक्त करून त्यांनी काही वेळ तिथे ठिय्या दिला .तसेच तक्रार तहसीलदारांकडे केली. वारंवार निकृष्ट जेवणाबद्दल तक्रारी करून वस्तीगृहाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले.मुलींना नेहमी निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते.हे जेवण पुरविण्यासाठी ठेकेदार नेमण्यात आला आहे.जेवणाविषयी कायम तक्रारी असताना शासकीय वसतिगृहाचे अधिकारी दुर्लक्ष करतात.वाॅर्डन शर्मीला निकाळे या वस्तीगृहात हजर राहत नाही.घटनेची माहीती मिळताच समाज कल्याण अधिकारी प्रदिप भोगले यांनी वस्तीगृहास भेट देवून मुलींच्या समस्या जाणून घेतल्या.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button