क्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मायणी येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी.

ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मायणी येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी.

मायणी प्रतिनिधी——-

मायणी येथील वीरशैव समाज बांधवांनी महात्मा बसवेश्वराची 893 वी जयंती उत्साहात व शोभायात्रा काढून साजरी करण्यात आली ही समाजबांधवाची एकी कौतुकास्पद आहे असे मत डॉक्टर. तांबेकर यांनी व्यक्त केली सकाळी महात्मा बसवेश्वराच्या प्रतिमेचे विधिवत पूजन औंधकर मठात संपन्न झाली त्यानंतर महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला संध्याकाळी सहा वाजता महात्मा बसवेश्वराच्या प्रतिमेची वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत वीरशैव समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सदर मिरवणूक ही चांदणी चौकात आल्यावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली रात्री मिरवणूक मठात आल्यानंतर महात्मा बसवेश्वर ची मंगल आरती करण्यात आली त्यानंतर महेश पुस्तके यांनी आपले मनोगत व्यक्त केली. या मनोगत त्यांनी सांगितले की स्त्री-पुरुषांना समान अधिकार देणारा लिंगायत हा प्राचीन धर्म आहे बसवेश्वर यांनी सर्व समाज बांधवांना एकत्र करून लिंगायत धर्माची दीक्षा दिली कष्ट करून उदरनिर्वाह करा असा संदेश त्यांनी दिला या कार्यक्रमास संजय गुदगे, दिलीप जगन्नाथ देशमुखे, डॉक्टर दत्तात्रय तांबवेकर, विजय खलीपे, नंदकुमार पुस्तके, अरविंद पुस्तके सर, दत्तात्रय पुस्तके, विश्वनाथ पुस्तके, सुनील खलीपे तसेच युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी उमेश पुस्तके यांनी सर्वांचे आभार मानले.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

 

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button