वाई:-“बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान”चा चौथा धडाका – स्वच्छतेसाठी प्रशासन मैदानात, लोकसहभागाला नवी धार!
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान”चा चौथा धडाका – स्वच्छतेसाठी प्रशासन मैदानात, लोकसहभागाला नवी धार!

वाई दि.२२ : बस स्थानक स्वच्छ, सुंदर आणि आदर्श बनवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानाचा चौथा सर्वेक्षण दौरा दमदार पद्धतीने पार पडला. या पाहणीमुळे प्रशासनाचा कडक संदेश आणि स्वच्छतेबाबतची गंभीरता पुन्हा एकदा स्पष्ट झाली.
या सर्वेक्षणासाठी अमरावती व सातारा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती विशेष ठरली. श्री रोहन पलंगे (प्रादेशिक व्यवस्थापक, अमरावती प्रदेश), श्री नितीन देशमुख (वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी, अमरावती प्रदेश) आणि श्री सचिन शिंदे (विभागीय वाहतूक अधिकारी, सातारा विभाग) यांनी प्रत्यक्ष भेट देत बस स्थानकातील स्वच्छता, सुविधा आणि सुशोभीकरणाची बारकाईने पाहणी केली.
अधिकाऱ्यांनी स्वच्छतेत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत स्थानक परिसर अधिक आकर्षक आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर करण्याच्या सूचना दिल्या.
या अभियानाचा गाभा म्हणजे “लोकसहभागातून परिवर्तन” — नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेत बस स्थानक स्वच्छ ठेवणे, हीच या मोहिमेची खरी ताकद आहे.
दरम्यान, या उपक्रमामुळे बस स्थानकांच्या रूपात लक्षणीय बदल दिसू लागले असून, “स्वच्छता हीच सेवा” हा संदेश आता प्रत्यक्षात उतरू लागल्याचे चित्र आहे.




