श्रीरामपूरच्या नेमबाज वेदांतची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड…
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

श्रीरामपूरच्या नेमबाज वेदांतची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड…

श्रीरामपूर माळेवाडी प्रतिनिधी ( PPS स्टार न्यूज)- श्रीरामपूर शहरातील वेदांत योगेश शेटे या तरुण नेमबाजाने राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या कौशल्याची छाप उमटवली आहे. नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेचे निकाल संपूर्ण राज्यभर जाहीर झाले असून, या स्पर्धेत त्याने उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावरील नेमबाजी स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
या स्पर्धेत त्याने राज्यात तृतीय क्रमांक पटकावला असून, मुंबई स्तरावरही तृतीय क्रमांक मिळवला आहे. विशेष म्हणजे पुणे शहरात प्रथम क्रमांक मिळवत त्याने आपली नेमबाजीतील अचूकता आणि एकाग्रता सिद्ध केली आहे. त्याच्या या यशस्वी प्रवासात सातत्य, मेहनत आणि जिद्दीचा मोठा वाटा आहे.
या यशामुळे त्याला राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. त्याच्या या यशाबद्दल वेदांतवर कौतुकाचा वर्षाव होत असून, भविष्यातही तो देशाच्या पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




