महाबळेश्वर:-महाबळेश्वर नजीक विद्युत खांबावरील वायरने वाहतुकीस अडथळा….
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
महाबळेश्वर नजीक विद्युत खांबावरील वायरने वाहतुकीस अडथळा….
महाबळेश्वर दि: थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर परिसरातील राज भवन मार्गावर जाणाऱ्या रस्त्यावर विद्युत खांबावरील विद्युत पुरवठा करणारी वायर तुटल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. या वेळेला सामाजिक कार्यकर्ते यांनी वायर बाजूला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वीस मिनिटं थांबलेली या रस्त्यावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.
याबाबत माहिती अशी की रविवार ९ जून दिनांक रोजी दुपारी साडेतीन वाजता महाबळेश्वर पोलादपुर रस्त्यावरील अचानक विद्युत खांबावरील वायर तुटून रस्त्यावर लोंबकळू लागली. यामुळे वेगाने येणाऱ्या वाहनांना अचानक ब्रेक लागला.
पुढील दुर्घटना होऊ नये यासाठी कोणीही वायरला हात लावण्यास पुढे येत नव्हते. काही प्रवासी व कोकणातून सातारकडे निघालेले काही वाहन चालक व पत्रकार अजित जगताप यांनी सदरची वायर बाजूला करून वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न केला.
नवलाईची गोष्ट म्हणजे या रस्त्यावर वाहने अडकून पडली होती.पण , एक प्रवासी वगळता कुणीही गाडीतून उतरून किंवा वायर बाजूला करण्याचे धाडस केले नाही. ते धाडस दोन पर्यटकांनी करून आपल्या सामाजिक कार्याची चुणूक दाखवली.
सदरच्या घटने नजिक्र स्त्यावर पाचशे मीटर अंतरावर महाबळेश्वर नगरपालिकेचे कर वसुली करणारे कर्मचारी होते. त्यांना याची कदाचित कल्पना नसावी पण एका बाजूने वाहतूक का थांबली आहे? एवढी चौकशी करण्याचे त्यांनी सौजन्य दाखवलं नाही. त्यामुळे कर वसूल करणे एवढेच प्रामाणिकपणाने जबाबदारी पार पाडली जात आहे. अशी शंका येऊ लागलेली आहे .
————————–
राजभवन नजीक वायर तुटून रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली.. वायर बाजूला करताना दोन प्रवासी