क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:- वाई आगारातील चालकाला मारहाण प्रकरणी कर्मचाऱ्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा.

*पत्रकार अनिता शिंदे महाराष्ट्र राज्य महिला संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS

 ब्रेकिंग न्यूज

वाई:- वाई आगारातील चालकाला मारहाण प्रकरणी कर्मचाऱ्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा.

 

वाई:-वाई आगारातील चालकाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांवरती कारवाईचे पोलीस निरीक्षक वाई आणि तहसीलदार वाई यांना निवेदन देण्यात आले. दि- 04/06/2024 रोजी वाई आगाराचे चालक श्री.गो.वी.एरंडे यांना किरकोळ अपघाताच्या कारणावरून ड्युटीवर असताना काही समाजकंटकांनी गुंडगिरी करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबतची ध्वनीमुद्रित दृश्य चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित झाली आहे. सदरची घटना अतिशय संतापजनक असून सामाजिक सलोखा बिघडवणारी, दहशत माजवणारी ,तसेच कायदा व सुव्यवस्थेचे लक्तरे वेशीवर टांगणारे आहे. सदरच्या मारहाणीच्या घटनेमुळे वाई आगारातील कर्मचाऱ्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदरची बाब अतिशय गंभीर असून आपणाकडून संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा वाई आगारातील सर्व कर्मचारी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील याची नोंद घ्यावी असे प्रतिपादन श्री अजय पिसाळ आगार अध्यक्ष ,श्री सुरेश मांढरे आगार कार्याध्यक्ष ,श्री गोविंद सूर्यवंशी आगार सचिव यांनी स्पष्ट केले आहे.

दुपारी १.१५ वा.चे सुमारास मौजे व्याहाळी कॉलनी तालुका वाहक बाळकृष्ण नारायण चव्हाण राहणार एकसर तालुका वाई जिल्हा सातारा असे आम्ही दोघे एसटी बस क्रमांक एम एच 07- C -7085 हि वाई ते बलकवडी घेऊन जात असताना अपघात झाल्याने चालक व वाहक गणवेशात असताना प्रवासी यांची पर्यायी एसटी सोय करून शासकीय कर्तव्य करीत असताना संतोष गणपत कदम व कमलाकर गणपत कदम दोन्ही राहणार दह्यात तालुका वाई यांनी मोटरसायकलवर येऊन काही एक विचारणा न करता तुझे हातपाय काढून टाकतो तू पुन्हा या रस्त्यावर दिस तुझ्या अंगावर गाडी घालतो असे म्हणून शिवीगाळ दमदाटी करून हाताने व लाथा बुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यातील एका इसमाने हातात दगड घेऊन आमच्या अंगावर टाकत असताना त्यांना आमची वाहक बाळकृष्ण नारायण चव्हाण यांनी अडवले अशी दोघांविरुद्ध वाई पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button