आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

साताऱ्यातील इंग्रजी माध्यम विद्यार्थी शुल्क बाबत ऑल इंडिया पॅंथर सेनेचे निवेदन.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

साताऱ्यातील इंग्रजी माध्यम विद्यार्थी शुल्क बाबत ऑल इंडिया पॅंथर सेनेचे निवेदन.

सातारा दि: शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असून पालक व विद्यार्थ्यांची लगबग सुरू झालेली आहे. आपला पाल्य इंग्रजी भाषेत शिकवा यासाठी पालक वर्ग शुल्क भरतो. परंतु, सध्या अनेक शाळेतील शुल्क वाढमुळे पालक वर्ग त्रस्त झाले आहेत . याबाबत ऑल इंडिया पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी सातारा जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेले आहे.
सातारा जिल्ह्यातील अतिदुर्ग व मागास भाग तसेच खेड्यापाड्यात स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, रयत शिक्षण संस्था तसेच स्थानिक पातळीवरती सामाजिक कार्यकर्त्यांनी शिक्षण संस्था उभ्या केल्या आहेत.
सातारा जिल्हा परिषदेने बहुजन समाजाला शिक्षण मिळावं यासाठी शिक्षण संस्था काढली. कोणतेही आर्थिक व्यवहार न करता समाज सुधारणेचा वसा घेतला. पण, अलीकडच्या काळामध्ये शिक्षणातून पैसा- पैशातून- उद्योग अशा चक्रात पालक व विद्यार्थी अडकलेले आहेत. सातारा शहराचा विचार केला तर पोतदार स्कूल, शानबाग स्कूल , मोना स्कूल, निर्मला कॉन्व्हेंट स्कूल, युनिव्हर्सल स्कूल, गुरुकुल, डेक्कन स्कूल व अशा अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळा उभारलेले आहेत . यापैकी काही शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना गुणवत्ता नुसार चांगले शिक्षण देत आहेत. त्यांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो. पण काही इंग्रजी माध्यमांच्या शाळेतून विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळत असले तरी सध्या शिक्षण घेणाऱ्या पाल्यांचे वाढते शुल्क व आर्थिक भुर्दंड पालकांवर पडत आहे.
या विरोधात ऑल इंडिया पॅंथर सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी श्री नागेश पाटील यांच्याकडे त्याबाबतचे निवेदन दिलेले आहे.
सदरच्या निवेदनाची प्रत सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक व शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या असून या वेळेला ऑल इंडिया पॅंथर सेनेचे सिद्धार्थ गायकवाड, रोहन कांबळे, आशिष मोरे, अजय कांबळे, मनोज जगताप, अमोल वालेकर, लक्ष्मण पोळ, विजय यादव, सुशांत वायदंडे ,रोहित बनसोडे, व रवी प्राधाने आधी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे कार्यकर्ते व पालक उपस्थित होते. याबाबत जिल्हा प्रशासन जिल्हा पोलीस यंत्रणा व शिक्षण विभागाने तातडीने कारवाई न केल्यास सोमवार दिनांक १७ जून रोजी सकाळी अकरा वाजता सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन केले जाईल. असा इशारा देण्यात आलेला आहे. ………………… …….. फोटो सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देताना ऑल इंडिया पॅंथर सेनेचे कार्यकर्ते (छाया -प्रकाश वायदंडे, सातारा)

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button