आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मायणी:-(खटाव)-सद्गुरु सरुताई मठाकरिता ब वर्ग दर्जा मिळवून देणारच – आ.जयकुमार गोरे

प्रा.दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक उपसंपादक 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 प्राध्यापक दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक उपसंपादक

RPS STAR NEWS

सद्गुरु सरुताई मठाकरिता ब वर्ग दर्जा मिळवून देणारच – आ.जयकुमार गोरे

मायणी प्रतिनिधी मायणी ही संतांची भूमी आहे.या भूमीत यशवंतबाबा, सरुताई या संतांनी जन्म घेऊन ही नगरी पावन केली.या संतांच्या भूमी साठी मी विशेष ब वर्ग दर्जा देण्याकरता विशेष प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आ.जयकुमार गोरे यांनी सद्गुरु सरुताई प्रकट दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ.दिलीपराव येळगावकर होते. तर सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. आर. गारळे,ट्रस्टचे सचिव रविन्द्र बाबर व सौ.सोनियाताई गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यादिवशी दुपारी १२ वाजता सद्गुरु सरुताईंची महाआरती श्री. व सौ.डॉ.येळगावकर यांच्या शुभहस्ते करण्यात आली. त्यानंतर यू टूब चॅनलवरील मातोश्री सरुताई लिलामृत ग्रंथाचे ऑनलाईन प्रकाशन आमदार जयकुमार गोरे,माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर व मान्यवरांच्या हस्ते झाले. आमदार जयकुमार गोरे आपल्या भाषणात पुढे म्हणाले,सद्गुरु सरुताई माऊलींची कृपा माझ्यावर असल्याने मी तीन वेळा आमदार झालो.त्यामुळे सरुताई माऊली चे ऋण कधीही विसरणार नाही.डॉ.दिलीपराव येळगावकर यांनी या मठासाठी व या भागातील पिण्याच्या पाण्यासाठी केलेले कार्य खरोखर कौतुकास्पद आहे. . यानंतर डॉ.दिलीपराव येळगावकर म्हणाले, सरुताई यांची प्रारंभी अज्ञानी समाजाकडून बरीच अवहेलना झाली.परंतु त्यांनी त्यांच्यावर कृपा दृष्टी केली.आम्ही या मठासाठी क वर्ग दर्जा मिळवला, त्यातून अनेक कामे झाली.परंतु ब वर्ग दर्जा मिळाला नाही.तरी याकडे आमदारांनी लक्ष द्यावे असे ते म्हणाले. या कार्यक्रमाच्या पूर्व संध्येला एकनाथ षष्ठी निमित्त डॉ.येळगावकर यांच्या घरी धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमास खटाव तालुका भाजप अध्यक्ष धनंजय चव्हाण,विशाल बागल, अंकुश रजपूत,जालिंदर माळी,संजय बागल, वडूज बाजार समितीचे संचालक अभिजित देशमुख,संचालक किरण जाधव,विनोद देशमुख, सुरेश(अण्णा)देशमुख, भरत जाधव,अभिजित येळगावकर,सौ.रेणू येळगावकर,सौ,उर्मिला येळगावकर,सौ.पल्लवी गुदगे,जयसिंग शिंदे,माजी जिल्हा पोलिस प्रमुख प्रदीप बाबर,महेश तांबवेकर,डॉ. तांबवेकर,अरुण चोथे,पोलिस पाटील प्रशांत कोळी,पांडुरंग लोहार,पांडुरंग तारळेकर व असंख्य युवा कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रशांत कुलकर्णी यांनी केले तर दिलीप पुस्तके यांनी आभार मानले.
शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button