सातारा:-महाराणी येसूबाई यांचे स्मारक झाले राज्य संरक्षित.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष
RPS STAR NEWS
महाराणी येसूबाई यांचे स्मारक झाले राज्य संरक्षित
●खासदार श्री.छ.उदयनराजे, मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यामुळे निघाली अंतिम अधिसूचना
●आमदार प्रवीण दटके यांचा ही पाठपुरावा
●माजी उपनगराध्यक्ष तथा महाराणी येसूबाई फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुहास राजेशिर्के
छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सुपुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी सातारा नगरीची स्थापना केली. त्याच छ.शाहू महाराज यांच्या मातोश्री महाराणी येसूबाई यांची समाधी राज्य सरकारने राज्य संरक्षित स्मारक केले आहे. त्याची अंतिम अधिसूचना आज दि.8रोजी काढण्यात आली असून हे कार्य करण्यासाठी खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यामुळे निघाली असून नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनीही प्रयत्न केले आहेत, अशी माहितीमाजी उपनगराध्यक्ष तथा महाराणी येसूबाई फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, ही साताऱ्याची भुमी ऐतिहासिक आहे. या भूमीला एक वेगळा इतिहास आहे. इतिहासात या भूमीचे वेगळे महत्व अधोरेखित झाले आहे. छ. शिवाजी महाराज यांच्या स्नुषा महाराणी येसूबाई यांनी छ.संभाजी महाराजांच्या नंतर 19 वर्ष कैदेत काढले. त्यांनी छ.शाहू महाराज यांच्यावर धर्मसंस्कार केले. छ.येसूबाई यांचे सातारच्या भूमीत 1729 साली आगमन झाले. छ.शाहू महाराजांनी मराठा साम्राज्याचा विस्तार केला. महाराणी येसूबाई यांच्या अखेरपर्यत त्या साताऱ्यात होत्या. त्यांची समाधी ही संगम माहुली येथे बांधली होती. परंतु तीनशे वर्षे इतक्या प्रदीर्घ कालावधीत सदर समाधीची विस्मृतीत गेली. 2013 सालापासून महाराणी येसूबाई फाउंडेशन व जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सदर समाधीची संशोधन कार्य चालू होते. 2023 मध्ये त्या संशोधन कार्यानुसार यशोगांचे समाधीची स्थाननिश्चिती करण्यात आली व त्याचा शोध निबंध अहवाल पुरातत्व विभागाकडे सुपूर्त करण्यात आला.
महाराणी येसूबाई यांच्या स्मारकाची स्वच्छता करण्यात आली. त्याकरिता राज्य शासनाने हे स्मारक राज्य संरक्षित व्हावे यासाठी खासदार श्री.छ. उदयनराजे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रराजे यांच्याकडे आमच्यासह शिवभक्तानी मागणी केली होती. तसेच नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी ही याबाबत पाठपुरावा केला होता. त्यामुळे आज बुधवार दि.8 रोजी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने अंतिम अधिसूचना काढली आहे. त्यामुळे आम्ही खासदार श्री. छ. उदयनराजे, मंत्री श्री. शिवेंद्रराजे आणि आमदार प्रवीण दटके यांच आभार मानतो, असे त्यांनी म्हटले आहे.
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी ही केले प्रयत्न
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या विभागाने अधिसूचना काढलेली असून त्यांचा ही यामध्ये प्रयत्न आहे. त्यांनी पदभार घेतल्यापासून सातारा जिल्ह्यातील जे जे करता येईल त्याकरिता त्यानी लक्ष घातले आहे. त्यांच्या विभागाच्या उपसचिव नंदा राऊत यांनी ही अधिसूचना काढली आहे.
किती आहे समाधीचे क्षेत्रफळ
महाराणी येसूबाई यांच्या समधीच क्षेत्रफळ 46.45 चौरस मीटर आहे.पूर्व बाजूला आनंदराव बाळू भासले यांचे घर, पश्चिम बाजूला संगम माहुली गावठाण, उत्तर बाजूला आनंदराव बाळू भासले यांची मोकळी जागा तर दक्षिण बाजूला कृष्णामाई रथ यात्रा शेड आहे.