पुणे:-बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भूषण पुरस्काराने वाईतील ज्येष्ठ पत्रकार दत्ता मर्ढेकर सन्मानित.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष
RPS STAR NEWS
बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भूषण पुरस्काराने वाईतील ज्येष्ठ पत्रकार दत्ता मर्ढेकर सन्मानित.
पत्रकारांच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असले तरी, जनतेचा पत्रकारांवर मोठा विश्वास आहे. पत्रकार हा समाजाचा दर्पण असावा, असे मत एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व पिंपरी चिंचवड शहर ,पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती यांच्या वतीने
आचार्य बाळशास्त्री जांभेकर – पत्रकार भूषण”
पुरस्कार श्री मर्ढेकर यांना देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी श्रीमती कौशिक बोलत होत्या, आमदार अमित गोरखे,पत्रकार सचिन जवळकोटे, उद्योजक संजय कलाटे, यशवंत भोसले, अध्यक्ष वसंत मुंडे, सरचिटणीस विश्वास आरोटे, संजय भोकरे, इरफान सय्यद, वैभव विधाटे, महादेव मासाळ, पराग कुंकूलोळ, गोविंद वाकडे मनीषा थोरात, सचिन चपळगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
विविध सामाजिक माध्यमे ही रंगीबेरंगी गॉगल तर पत्रकारिता हा वास्तविकतेचा चष्मा आहे, असेही श्रीमती कौशिक म्हणाल्या.
पत्रकाराने समाजातील वास्तविकता मांडताना निर्भिड योगदान द्यावे, अनिष्ट रिती समस्या यांना वाचा फोडण्याची जबाबदारी ही पत्रकारांवरच आहे असे श्री. प्रभुणे यांनी सांगितले.
परिसंवादाचे उद्घाटक माजी आमदार विलास लांडे म्हणाले, पत्रकार हा सामाजिक व्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत पत्रकारिता व सामाजिक कार्य हे एकमेकांस पूरक राहिले आहेत.
यावेळी ‘ महाराष्ट्र (माध्यमांची) दशा आणि दिशा ‘ हा परिसंवाद रंगला संवादक अभिनेते किरण माने यांनी पत्रकारितेबद्दल प्रश्न उपस्थित करून प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविल्या.
कार्यक्रमात आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भूषण पुरस्काराने दत्ता मर्ढेकर व राज्यातील पत्रकारांना गौरविण्यात आले. नितीन शिंदे यांनी स्वागत केले.अश्विनी सातव यांनी सूत्रसंचालन, अतुल क्षीरसागर यांनी आभार मानले.
—–
फोटो ओळी: एबीपी माझा च्या संपादिका सरिता कौशिक, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, संजय भोकरे यांच्या हस्ते पत्रकार भूषण पुरस्कार स्वीकारताना ज्येष्ठ पत्रकार दत्ता मर्ढेकर, शेजारी किरण माने, सचिन जवळकोटे, नितीन शिंदे, दिपाली चिल्लाळ व इतर