कराड:-स्वर्गीय यशवंतराव बाबुराव पाटील उर्फ आबासाहेब पार्लेकर यांची 115 वी जयंती साजरी.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष:-9762274165

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष
स्वर्गीय यशवंतराव बाबुराव पाटील उर्फ आबासाहेब पार्लेकर यांची 115 वी जयंती साजरी.
कराड: -महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार,स्व.यशवंतराव चव्हाण (साहेब)यांचे विश्वासू सहकारी,पार्ले,ता.कराड गावचे जेष्ठ नेते,कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार,सातारा जिल्हा परिषद सातारा पहिले अध्यक्ष,सातारा जिल्हा कॉंग्रेस कमिटी सातारा पहिले अध्यक्ष,सह्याद्री सहकारी साखर कारखाना लि.यशवंतनगर माजी चेअरमन,लोकनेते,स्व.यशवंतराव बाबुराव पाटील उर्फ आबासाहेब पार्लेकर यांना ११५ व्या जयंतीनिमित्त पार्ले ता.कराड येथील समाधीस्थळी
कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील, कराड पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील दादा, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, बनवडी चे सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच विकास कारंडे, कोपर्डे चे सरपंच दत्तात्रेय चव्हाण, कराड उत्तरचे युवा काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव, डॉक्टर अशोक गुजर, शंकरराव खापे, वसंतराव जगदाळे सह्याद्री कारखान्याचे संचालक लालासो पाटील, रामदास पवार, भाऊसो घाडगे, अधिक सुर्वे ,दिगंबर डांगी, बाळासाहेब सुर्यवंशी, प्रकाश बापू पाटील, मानसिंगराव जाधव, दादासाहेब जाधव, विजय आतकरी, सत्वशील कदम, धनाजी काटकर, रंगराव थोरात, माणिकराव थोरात, पैलवान संजय थोरात, नेताजी चव्हाण ,भीमराव ढमाले, कल्याणराव डुबल,माणिकराव पाटील, सी.बी कदम, चंद्रकांत जाधव, नंदकुमार बटाणे, पटेल गुरुजी, वैजनाथ थोरात तसेच शिवम प्रतिष्ठानचे पदाधिकारी तसेच कराडचे लोकप्रिय खासदार श्रीनिवास पाटील यांनी फोनवरून अभिवादन केले. पार्ले, बनवडी, सैदापूर, करवडी, सदाशिवगड भागातील विविध मान्यवर उपस्थित राहून अभिवादन केले.