ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

ठाणे:-आयटक जनजागरण उद्या यात्राला ठाणे येथे.

पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

   ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस
(ठाणे जिल्हा कौन्सिल)

————————————–
पनवेल                दिनांक २४.११.२०२३

    आयटक जनजागरण उद्या यात्राला ठाणे येथे.
———————————
बीजेपी सरकार कामगार,कष्टकरी, शेतकरी,व बेरोजगार विरोधी सन २०१४ पराजय निश्चित :-कॉम्रेड राजू देसले चिटणीस महाराष्ट्र आयटक.
———————————

ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस महाराष्ट्र कौन्सिलच्या वतीने दिनांक २० नोव्हेंबर कोल्हापूर या यात्रेची सुरुवात झाली असून ही यात्रा रत्नागिरी जिल्ह्यातून ठाणे जिल्ह्यात दिनांक २४ नोव्हेंबरला पोहोचली.या यात्रेमध्ये आयटकला संलग्न असलेल्या विविध कामगार संघटनाचे नेते व सभासद सहभागी झालेले आहे.देशातील भारतीय जनता पार्टी आघाडी सरकार कामगार,कर्मचारी, शिक्षक,शेतकरी,शेतमजूर, बेरोजगार व संघटित संघटित क्षेत्रातील कामगार यांच्या विरोधीत आहे.या सरकारला सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकी मध्ये हरवायला पाहिजे. देशाच्या संविधानाचे रक्षण झाले पाहिजे, सार्वजनिक उद्योगाचे रक्षण झालं पाहिजे, केंद्र सरकारने रद्द केलेले कामगार कायदे बहाल करावे,जुनी पेन्शन योजना लागू करावी,रिक्त असलेल्या हजारो जागा भराव्या, असंघटित क्षेत्रातील कामगारांना कायद्याचे संरक्षण द्यावे,सर्व कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करावी,इत्यादी मागण्यांना घेऊन जनजागरण संघर्ष राज्यव्यापी यात्रा,भाजपा हटाव देश बचाव,जनाविरोधी सरकार हटाव,महाराष्ट्र बचाव* *सरकार हटाव सविधान बचाव हा नारा देऊन सुरू आहे.
यात्रा दिनांक २४ नोव्हेंबरला ठाणे जिल्ह्यात पोचली असता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यां यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले.त्याच ठिकाणी जनजागरण यात्रेची सभा झाली कॉम्रेड शाम काळे राज्य सरचिटणीस ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली.या सभेला कॉम्रेड श्याम काळे, कॉम्रेड राजू देसले,कॉम्रेड कृष्णा भोयर राज्य सचिव आयटक व विविध कामगार नेते यांनी संबोधित केले. या यात्रेला विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी एम.ए.पाटील, गिरीश भावे,के.एस.बगेरा,सौ.वदंना शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.
आयटक कामगार नेते कॉम्रेड राजू देसले यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणावर प्रखर टीका केली व २०२४ च्या सार्वजनिक लोकसभा निवडणुकी मध्ये भारतीय जनता पार्टी आघाडी सरकारचा पराभव करा असे आव्हान वक्त्याने केले केले.दिनांक १८ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर विधानसभेवर हिवाळी अधिवेशना वर एक लाख आयटक कामगाराचा मोर्चा काढून केंद्र व राज्य जनविरोधी सरकार बदलण्याचा संकल्प जाहीर केला.
जनजागरण यात्रेमध्ये महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, आरोग्य खाते नर्सेस कामगार संघटना, रायगड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटना इत्यादी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. आंदोलनामध्ये काँ.लिलेश्वर बनसोड यांनी जोरदार घोषणा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉम्रेड उदय चौधरी यांनी केले,तर आभार प्रदर्शन कॉम्रेड विजय नाकती यांनी केले. यात्रा आयोजित करण्याकरीता शंकरदादा कोंडिलकर,संतोष चचाने, मंजू वर्मा,अविनाश रणदिवे,उदय चौधरी,संकल्पना चौधरी,रवींद्र सिंग चव्हाण,जयेश भोईर,संजय महाप्रळकर,कॉम्रेड शिरसागर सह शेकडोच्या संख्येने कामगार सहभागी झाले होते. सभा यशस्वी करण्याकरता महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या भांडुप,कल्याण व वाशी परीक्षण झोन मधील पदाधिकाऱ्यांनी कठोर परिश्रम घेतले. सभा समाप्त झाल्यानंतर यात्रा पालघरच्या दिशेने रवाना झाली.
*आपला विश्वासू*
*कॉम्रेड कृष्णा भोयर*
*राज्य सचिव ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस*
*सरचिटणीस महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन*
मोबाईल नंबर 9930003608

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button