मायणी:-मायणी ग्रामपंचायत मार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना वॉटर प्युरिफायर चे वाटप.
प्रतिनिधी:-प्रा. दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक-प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
मायणी ग्रामपंचायत मार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना वॉटर प्युरिफायर चे वाटप.
मायणी प्रतिनिधी___शुद्ध व स्वच्छ पाणी प्रत्येक मुलाला मिळाले पाहिजे आजची मुलेही उद्याची राष्ट्राची संपत्ती आहे 90% साथीचे आजार हे पाण्यापासून होतात या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन ग्रामपंचायतच्या वतीने 15 व्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना तसेच मुलींच्या शाळांना व अंगणवाड्यांना नवीन वॉटर प्युरिफायर सरपंच युवा नेते सचिन गुदगे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले यावेळी बोलताना सचिन गुदगे म्हणाले की आम्ही सर्वजण याच शाळेत शिकलो आहोत शाळा ही आमची जननी आहे या मातीचे ऋण फेडणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे या भावनेतून आम्ही या शाळेला संगणक स्पीकर सेट संरक्षक भिंत व वॉटर पुरिफायर अशा अनेक भौतिक सुविधा दिल्या आहेत शाळेने गुणवत्ता शिस्त व संस्कार या त्रिसूत्री वर काम केल्यामुळे शाळेला अ दर्जा मिळाल्याचे मला समाधान वाटते या पुढेही आम्ही अशीच मदत करत राहू अशी त्यांनी सांगितले या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य विजय कवडे माजी उपसरपंच आनंद शेवाळे पोलीस पाटील प्रशांत कोळी ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी विजय देशमुख प्राध्यापक दिलीप पुस्तके इब्राहिम जमादार मुख्याध्यापक उमा वडगावकर, रामचंद्र सूर्यभान जगताप, अलका विजय पिसाळ, वैशाली कृष्णात कालेकर, विजया प्रशांत सनगर, मैथिली सुनील देशपांडे ,जयश्री प्रमोद निकम वनिता कुलकर्णी, शेडगे गुरुजी, कोणाळे गुरुजी, निकम मॅडम, नदाफ मॅडम ,कलढोणे मॅडम उपस्थित होत्या शेवटी रामचंद्र सूर्यभान जगताप यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनाचे काम केले