आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पनवेल:-वाशी सर्कल संघटनात्मक बैठक पनवेल येथे संपन्न.

पत्रकार सौ.कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार सौ.कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

RPS STAR NEWS

वाशी सर्कल संघटनात्मक बैठक पनवेल येथे संपन्न.

 दिनांक १ मे कामगार दिन व कामगार मेळावा घेवून नेरूळ येथे आयोजित करण्याचा निर्णय.

कृषी भूषण कॉम्रेड दत्ता देशमुख कामगार भूषण पुरस्काराचे वितरण करणार.

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी.

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन वाशी मंडळातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक दिनांक १३.०४.२०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजता रायगड जिल्हा विद्युत कर्मचारी सहकारी पतसंस्था कार्यालय पनवेल येथे कॉम्रेड कृष्णा भोयर सरचिटणीस यांच्या अध्यक्षतेखाली तर कॉम्रेड दत्तात्रय कांबळे संयुक्त सचिव, कॉम्रेड भारती भोयर महिला आघाडी अध्यक्ष,कॉम्रेड विजय नाकती भांडुप झोन सचिव,कॉम्रेड जगदीश महात्रे भांडुप झोन उपसचिव,कॉम्रेड सुयोग पाटील भांडुप झोन सचिव,कॉम्रेड शशिकांत म्हात्रे वाशी मंडळ सचिव, कॉम्रेड योगेश बागुल वाशी विभाग सचिव,कॉम्रेड मधुकर कोळी नेरूळ विभाग सचिव,कॉम्रेड गणेश करवले नेरूळ विभाग अध्यक्ष,कॉम्रेड अविनाश जगताप वाशी चाचणी विभाग सचिव,कॉम्रेड मनोज शिंदे नेरूळ उपविभाग सचिव यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाली.
बैठकी मध्ये दिनांक १ मे कामगार दिवस भव्य दिव्य स्वरूपा मध्ये दत्त मंदिर सभागृह,ए.पी.जे.स्कूल समोर, सेक्टर-१५ नेरूळ येथे सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.सकाळी १०.०० वाजता नेरूळ उपविभाग येथून पैदल रॅली काढण्यात येईल.या कार्यक्रमा करिता वाशी मंडळ तसेच नेरूळ, पनवेल,वाशी व वाशी चाचणी विभागातील केंद्रीय,झोन,मंडळ, विभाग रु.१००० तर उपविभाग व शाखा प्रमुख यांनी प्रत्येकी रु.५०० वर्गणी विभागीय सचिव यांच्याकडे दि.२०.०४. २०२४ पर्यंत जमा करावी असा निर्णय घेण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉम्रेड कृष्णा भोयर,उद्घाटक  मा.अरविंद भादिकर संचालक (संचलन व मासं) महावितरण कंपनी,प्रमुख मार्गदर्शक कॉम्रेड देविदास तुळजापूरकर बँक कर्मचाऱ्यांचे नेते व सरचिटणीस ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन, प्रमुख उपस्थिती मा.सुनील काकडे मुख्यअभियंता भांडुप परिमंडळ, मा.सिहाजीराव गायकवाड अधिक्षक अभियंता वाशी, मा.ललित गायकवाड सह मुख्य औधोगिक संबंध अधिकारी महावितरण कंपनी प्रकाशगड,कॉम्रेड लिलेश्वर बनसोड,दत्तात्रय कांबळे, औदुंबर कोकरे संयुक्त सचिव, सौ.भारती भोयर अध्यक्ष महिला आघाडी,सौ.मंजू वर्मा सचिव महिला आघाडी तिन्ही झोन मधिल केंद्रीय कार्यकारिणी सदस्य/सदस्या, झोनल अध्यक्ष/सचिव, भांडुप,पेण व कल्याण पतसंस्था संचालक तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी यांना निमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कृषी भूषण कॉम्रेड दत्ता देशमुख कामगार भूषण पुरस्काराचे वितरण करणार.
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे माजी अध्यक्ष कृषी भूषण कॉम्रेड दत्ताजी देशमुख यांच्या नावाने सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये संघटनेत व महावितरण कंपनी मध्ये चांगली कामगिरी करणारे संघटनेचे पदाधिकारी व सभासद यांच्यामधून निवड करून *कॉम्रेड दत्ता देशमुख कामगार भूषण पुरस्कार* जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून दि.१ मे रोजी देण्याचा निर्णय घेण्यात आला.या पुरस्कारा करिता वाशी मंडळातील प्रत्येक उपविभागात-१ पुरस्कार असे नेरूळ विभागातून-३,वाशी विभागातून-३ पनवेल विभागातून-५, वाशी चाचणी विभागातून-१ वाशी सर्कल मधून-१ नावाची शिफारस या विभागातील संघटनेचे पदाधिकारी सर्कल कमिटीकडे करतील.सर्कल कमिटी अंतिम नावे फायनल करून पुरस्कार जाहीर करतील.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी.

आज   दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती आहे. त्यानिमित्ताने आयोजित बैठकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब  आंबेडकरांच्या जीवनकार्य,भारतीय संविधान या विषयी विस्तृत माहिती सरचिटणीस कॉम्रेड कृष्णा भोयर यांनी दिली.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्ट असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button