आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मायणी:-(खटाव)-विद्यार्थ्यांनी आई-वडील व शिक्षकांच्या चरणी नतमस्तक होणे गरजेचे___डॉक्टर दिलीपराव येळगावकर.

ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

विद्यार्थ्यांनी आई-वडील व शिक्षकांच्या चरणी नतमस्तक होणे गरजेचे___डॉक्टर दिलीपराव येळगावकर.

मायणी प्रतिनिधी__सध्याच्या स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करता आले पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांनी आई वडील व शिक्षकांच्या चरणी नतमस्तक होऊन ज्ञान मिळवले पाहिजे असे मिळवलेले ज्ञान जन्मभर टिकते. यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटी ठेवली पाहिजे असे स्पष्ट मत चे माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांनी स्फूर्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित इंग्लिश स्कूलच्या इयत्ता दहावी विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ व शुभचिंतन समारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले. या कार्यक्रमाची प्रमुख पाहुणे समाजभूषण हणमंतराव साळुंखे विद्यालयाचे चेअरमन संजीव साळुंखे होते तर भारतीय हॉकी टीचर व आरएसएस चे महाराष्ट्र ट्रेनर लक्ष्मणराव थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी विद्यार्थ्यांनी गायलेल्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला याच वेळी इयत्ता दहावीत परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभचिंतन करण्यात आले याची वेळी एन एम एम एस परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी स्कॉलरशिप, एम एम एस, सारथी, मंथन या स्पर्धात्मक परीक्षेसाठी ज्यादा मार्गदर्शन करणाऱ्या श्री किरण जाधव व मुबारक तांबोळी यांचा जाहीर सत्कार करण्यात आला नंतर बोलताना आंतरराष्ट्रीय हॉकी शिक्षक लक्ष्मणराव थोरात यांनी अभ्यासासोबत खेळाचे महत्व सांगून मी या शाळेत हॉकी टीम तयार करणार असल्याचे सांगितले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संजीव साळुंखे यांनी शाळेतील गुणवत्तेची प्रशंसा करून विद्यार्थ्यांना जिद्दीने परीक्षेला सामोरे जाण्याचे आवाहन केले या कार्यक्रमास सौ उर्मिला येळगावकर, रेणू येळगावकर, नाथाजी सानप, गंगाराम सुगदरे, मानसिंग देशमुख, जनार्दन देशमुख, सुरज पाटील, आनंदा शेवाळे, आप्पा भिसे, पल्लवी गुदगे, मोहन दगडे, गणीभाई मुल्ला तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी संचालक प्राचार्य, शिक्षक महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी बरकत शेख यांनी आभार मानले तर सुखदरे मॅडम यांनी सूत्रसंचालन केले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button