आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

दिव्या चेचरे हिचा लोहगाव ग्रामस्थांच्या वतीने सत्कार.

प्रतिनिधी :- कोंडीराम नेहे :-7507469042

लोहगाव ( प्रतिनिधी) शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही अनेक विद्यार्थी हुशार असतात. त्यांच्या गुण, कौशल्य, हुशारीला संधी मिळाली तर नक्कीच ते आपल्या बुद्धी कौशल्याचे सोने करतात. अशाच विद्यार्थ्यांपैकी राहाता तालुक्यातील लोहगाव येथील कुमारी दिव्या संपत चेचरे ही विद्यार्थिनी आपल्या शेतकरी कुटुंबात शेतातील कामे करून, आपल्या आई-वडिलांना कामामध्ये साथ देऊन ,घरातील घरकामात आईला मदत करून तिने आपल्या बुद्धी कौशल्यावर नुकत्याच एसएससी परीक्षेत 92. 5 टक्के गुण मिळवून विशेष यश मिळवले आहे. या विशेष प्राविण्य मिळवलेल्या कुमारी दिव्या संपत चेचरे या विद्यार्थिनीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. ती
प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालयात दहावी मध्ये होती. तिच्या या यशाचे माजी मंत्री व आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही विशेष तिचे कौतुक केले आहे. आमदार राधाकृष्ण विखे पाटील युवा मंच लोहगाव यांच्यावतीने कु. दिव्या हिचा तिला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल तिचा नुकताच यथोचित सत्कार करण्यात आला. कुमारी दिव्याला पुढील शिक्षणासाठी व पुढील वाटचालीस यावेळी सर्वांनी शुभेच्छा दिल्या. असेच यश पुढील शिक्षणात मिळवून आपल्या परिवाराचे ,गावाचे, शाळेचे तालुक्याचे, जिल्ह्याचे नाव अधिक उज्ज्वल करण्यासाठी तिला यावेळी अनेकांनी शुभेच्छा देत तिचे कौतुक केले. यावेळी सोसायटीचे चेअरमन राजेंद्र
केरूनाथ चेचरे, माजी सरपंच गणेश चेचरे, पोलीस पाटील वसंत चेचरे, ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीपराव इनामके, दत्तात्रेय चेचरे, अशोक चेचरे, बबन चेचरे, कृष्णा चेचरे, ज्येष्ठ पत्रकार कोंडीराम नेहे, तसेच युवा मंच चे रंजित दिलीपराव इनामके, किशोर तुरकणे, स्वप्निल इनामके, रोहित डांगे, चेतन दरंदले, संदीप घोलप, किरण दरंदले, प्रशांत डांगे, अक्षय इनामके, सागर वाडगे, आदींसह विविध मान्यवर यावेळी उपस्थित हो: शेतकरी कुटुंबातील कु. दिव्या
चेचरे हिने दहावी परीक्षेत मिळवले 92 . 5 टक्के गुण!

आ. राधाकृष्ण विखे पाटील युवा मंच लोहगावच्या वतीने तिचा नुकताच करण्यात आला सन्मान!

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button