सातारा:-साताऱ्यात भटक्या कुत्र्यांबाबत वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराच्या वाहनाची सीट कव्हर फाडले …
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
साताऱ्यात भटक्या कुत्र्यांबाबत वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराच्या वाहनाची सीट कव्हर फाडले …
सातारा दि: प्रामाणिक व इमानदार प्राणी म्हणून कुत्र्याचा उल्लेख केला जातो. परंतु ,सातारा शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे . याबाबत लक्ष वेधून घेण्यासाठी विशाल मनाच्या एका जागरूक पत्रकार वार्तांकन करण्यासाठी आले होते. परंतु ,चाणक्य कुत्र्यांनी त्याच पत्रकाराच्या वाहनाच्या सीट कव्हर फाडून आंदोलन केल्याची खमंग चर्चा होऊ लागलेली आहे. याबाबत माहिती अशी की, गेली तीन आठवडे कोसळणाऱ्या पावसामुळे सातारा जिल्ह्यातील सर्वच रस्त्याची चाळण झालेली आहे. तर दुसऱ्या बाजूला भटक्या कुत्र्यांसह मच्छर, डास यांचा उपद्रव वाढलेला आहे. याबाबत माहिती संकलन करण्यासाठी आज बुधवार दिनांक 31 जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयाच्या आवारात माहिती घेण्यासाठी पत्रकार गेले होते. त्यांनी फोटो व चित्रीकरण करण्यास सुरुवात करताच एका कुत्र्याने बरोबर त्याच पत्रकाराच्या दुचाकी वाहनाचे कव्हर सीट फाडून आपली भूमिका कृतीतून दाखवून दिले. वार्तांकन सोडून बिचारा पत्रकाराला आपल्या वाहनाची शीट वाचवण्यासाठी हातात दगड घ्यावा लागला. त्यामुळे भटक्या कुत्र्यांनी तिथून पळ काढला. सध्या साताऱ्यात किमान दीड हजार भटकी कुत्रे वावरत असल्यामुळे वयोवृद्ध, आजारी व लहान मुलांना भीतीच्या छायेखाली वावरत मार्गक्रमण करावे लागत आहे. एवढेच नव्हे तर वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराला त्याचा फटका बसल्यामुळे आता याबाबत नेमकं कोणी लक्ष द्यावे? असा प्रश्न आता पडला आहे. ………………………….. फोटो- भटक्या कुत्र्यांनी पत्रकाराच्या वाहनाची शीट फाडताना (छाया- अनोळखी व्यक्ती,सातारा)