आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कराड:-वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड ची विद्यार्थिनी कु.नम्रता कुंभारला गोल्ड मेडल.
प्रतिनिधी प्रा.संतोष बोंगाळे कराड:-9923900840

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड ची विद्यार्थिनी कु. नम्रता कुंभारला गोल्ड मेडल.
कराड :(दि. 19 जानेवारी प्रतिनिधी) वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडची विद्यार्थिनी कु. नम्रता हरी कुंभार (बी. ए. भाग 2) हिने शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय पावर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये 76 किलो वजनी गटामध्ये 160 किलो वजन उचलून प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्याबद्दल तिला गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
या उज्ज्वल व नेत्रदीपक यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण संस्था, विद्यानगर, कराडच्या उच्च शिक्षण मंडळ, विद्यानगर कराडचे जनरल सेक्रेटरी मा. श्री प्रकाश पाटील (बापू) तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव यांनी कु. नम्रता कुंभार हिचे कौतुक व अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.