वाई:-(शिरगाव)-शिक्षणप्रेमी शिरगांव – Speciality Sintered Ltd.Shirval.(E-gears Ltd.) या कंपनीच्या सामाजिक दायित्व(CSR) फंडातून माध्यमिक विद्यालय शिरगाव चे रंगकाम……
पत्रकार सुरेखा भोसले वाई तालुका महिला कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
शिक्षणप्रेमी शिरगांव – Speciality Sintered Ltd.Shirval.(E-gears Ltd.) या कंपनीच्या* सामाजिक दायित्व(CSR) फंडातून माध्यमिक विद्यालय शिरगाव चे रंगकाम……
Speciality Sintered Ltd.Shirval.(E-gears Ltd.) या कंपनीच्या सामाजिक दायित्व(CSR) फंडातून माध्यमिक विद्यालय शिरगाव या शाळेचे रंगकाम करण्यात आले. याचेच उतराई होण्यासाठी दिनांक 21 रोजी माध्यमिक विद्यालय शिरगाव येथे कंपनीचेHR head व लेवा ग्रुप चे सर्व सहकारी यांचे स्वागत व आभाराचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाला उपस्थित मा. जि.प. अध्यक्ष उदय दादा कबुले, पंचायत समितीचे माजी उपसभापती महादेव भाऊ मस्कर, कंपनीच्या कार्पोरेटHR head अंकिता अग्रवाल, शिरवळ ग्रुप HR head योगेश सोनवणे ,लेवा ग्रुप चे सर्व सहकारी,ग्रामस्थ ,तसेच शिक्षक उपस्थित होते .
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जाधव मॅडम यांनी प्रास्ताविक केले … अध्यक्षीय भाषणात माननीय उदय दादा कबुले यांनी येत्या दोन महिन्यात विद्यालयाला आकर्षक अशी कम्प्युटर देण्याची ग्वाही दिली. कंपनीच्या कार्पोरेट HR head अंकिता अग्रवाल मॅडम यांनी उपस्थित मुलांना आताच्या कॉम्पिटिशनच्या युगात टिकण्यासाठी इंग्रजी भाषेचे महत्त्व पटवून सांगितले ….. माजी उपसभापती महादेव भाऊ मस्कर यांनी मुलांना मार्गदर्शन केले …..शाळेचे रंगकाम होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संदीप दादा पिसाळ व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन भोसले यांनी खूप प्रयत्न केले यासाठी उदय दादांनी कौतुक केले …..यावेळी माजी पंचायत समिती सदस्य मधुकर दादा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले ….शिक्षण प्रेमी दिलीप सर यांनी कंपनीचे आभार आभार मानले व मुलांना मार्गदर्शन केले……यावेळी गावच्या प्रथम नागरिक सरपंच देवता भोसले , उपसरंच रघुनाथ भोसले , सदस्य उज्वला ताई बचत गट प्रतिनिधी सुरेखा भोसले आणि ग्रामस्थ उपस्थित होते .. अशाप्रकारे खेळीमेळीच्या वातावरणात स्वागत सत्कार समारंभ संपन्न झाला.