आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वार्षिक सभेत होणार हिशोब चुकता.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वार्षिक सभेत होणार हिशोब चुकता.

सातारा : छडी लागे छम छम विद्या येई घमघम, असा नारा देऊन विद्यार्थ्यांना घडवणार्‍या शिक्षकांच्या सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या 76 व्या वार्षिक सभेत आता शिक्षकच आर्थिक व्यवहारातूनच शिक्षकांवरच छडी उगारणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
रविवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता सातारा शहरातील महामार्ग म्युझिक जनरेशन नाका येथील महामार्ग नजीक जरंडेश्वर नाका येथील श्री साई दत्त मंगल कार्यालयात बँकेचे विद्यमान चेअरमन राजेंद्र बोराटे यांच्या अध्यक्षतेखाली ही सर्वसाधारण वार्षिक सभा होत आहे. या सभेला एकूण 11 विषय असून मुख्य कार्यकारी अधिकारी छगन खाडे यांनी सर्व शिक्षक सभासदांना सदर अहवालाची प्रत पाठवली आहे. वास्तविक पाहता या प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेमध्ये नुकतेच सत्तांतर झाले आहे.
बँकेच्या 10,283 नामधारी 1094 सभासद असून आर्थिकदृष्ट्या बचत ठेव, चालू ठेव, अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा, दुर्बल घटक कर्ज पुरवठा या बँकेत नियमित होत असतो .प्राथमिक शिक्षक बँकेने मागील चार वर्षात साडेदहा ते नऊ टक्के लाभांश जाहीर केला आहे. मात्र यंदाच्या वर्षी सहा टक्के लाभांश देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. तसेच निवळ नफा पूर्वी 475.85 लाख होता. तो आता 310.15 लाख एवढा कमी झालेला आहे. सेवक खर्च गेल्या वर्षी 1299.40 लाख तो 2022-23 ला 1349.70 लाख झाला आहे. याचा अर्थ बँकेच्या खर्चावर नियंत्रण राहिलेले नाही. असा आरोप विरोधक निश्चितच करतील. चेअरमन राजेंद्र बोराटे, व्हाईस चेअरमन विजय बनसोडे तसेच इतर संचालक यांनी यापूर्वी सत्ता नसताना सत्ताबाह्य केंद्राच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन सत्ताधार्‍यांच्या विरोधात आरोप केले होते. आज हीच मंडळी आरोपाच्या पिंजर्‍यामध्ये उभी करण्यात आलेली आहेत.
सध्या प्राथमिक शिक्षक सहकारी बँक वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे युद्धभूमी असं त्याचे वर्णन होत असते. शिक्षक राव तुम्ही सुद्धा असं म्हणण्याची पाळी विद्यार्थ्यांवर आली आहे. त्यामुळे शिक्षकांऐवजी येरे माझ्या मागल्या खडू फळा चांगला, हे म्हणण्याची पाळी विद्यार्थ्यांवर येऊ नये असं चांगलं काम शिक्षकांनी या शिक्षक बँकेच्या सभेनिमित्त करावे, अशी विनंती सभासदांनी केली आहे.
प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या 76 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने सर्वसामान्य सभासदांना प्रश्न पडला आहे. की, नेमके सत्ताधारी कोण? अभद्र युतीचा फायदा संघटनेला, की महत्त्वाकांक्षी व्यक्तीला मिळाला, हे शोधण्याची आता गरज निर्माण झाली आहे. पूर्वी बँकेचा कारभार हा बँकेत बसून होत होता. आता या बँकेत एक अंबानी शिरला असून या अंबानीच्या पुंगीवर अनेक नाग डोलू लागले आहेत. त्यांना आता पश्‍चाताप होत आहे. ज्यांनी चेअरमनपद भोगले, त्यांचा पूर्व व सध्याचा इतिहास आम्हाला याठिकाणी मांडायचा नाही. सौ चुहे खाके बिल्ली हज को चली, यातच सर्वकाही आले आहे.
सध्या बँकेच्या कारभारामध्ये चेअरमन व व्हा. चेअरमन हे खुर्चीचे मालक झालेले आहेत. पण प्रत्यक्षात शिक्षक बँकेच्या पैशांवर आपला उद्योग-व्यवसाय वाढवणारे अंबानी हे सत्त्या चित्रपटासारखे गँग चालवित आहेत. या शॅडो चेअरमन मुळे बँकेची प्रतिमा काळवंडली असून सहकारात आता, कसं काय पाटील बरं हाय का, काल काय ऐकलं ते खरं आहे का? हे मराठी चित्रपटातील गीत आता स्वप्नातही ऐकू येवू लागले आहे. त्याचे उत्तर काळच देईल. तोपर्यंत ज्येष्ठ मार्गदर्शकाचा रतीब शोले चित्रपटासारखा झाला आहे. तो म्हणजे जब तक है जान, मैं नाचूंगी आणि दुसरा म्हणजे ये हात मुझे दे दे ठाकूर… ये समझनवाले को इशारा काही है. त्यामुळे प्राथमिक शिक्षक बँकेची ही सभा अत्यंत शांततापूर्ण वातावरणात पार पडावी. जो शिशे के घर में रहते है, वो दुसरो के घरोंपर पत्थर नही मारा करते, हे आता समजलेच असेल. तूर्त एवढेच.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button