महाबळेश्वर:-सलग आलेल्या सुट्यामुळे पर्यटकांनी महाबळेश्वर बहरले.
पत्रकार रियाज मुजावर महाबळेश्वर तालुकाध्यक्ष:-9403546485

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार रियाज मुजावर महाबळेश्वर तालुकाध्यक्ष
महाबळेश्वर
जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले महाबळेश्वर पांचगणी पर्यटकांचे माहेरघर आहे. निसर्गरम्य हिरव्या गार वनराईने नटलेल्या महाबळेश्वर पर्यटन स्थळी स्वातंत्र्य दिन त्याआधी शनिवार, रविवार आणि बुधवारी पारशी नववर्षाची सुट्टी असल्याने पर्यटकांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. महाबळेश्वर मध्ये हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. तसेच वातावरणात कमालीचा गारठा वाढला आहे. हिरव्यागार वनश्रीने महाबळेश्वर चे रूप पूर्णपणे पालटले आहे. डोंगररांगा मधून उंचावरून वाहणारे धबधबे, दाट धुक्याची चादर पसरल्याने निसर्गाचे मनमोहक दृश्य पर्यटकांना पहावयास मिळत आहे. ठिकठिकाणी पावसात भिजण्याचा आनंद पर्यटक घेत आहे.
वेण्णा लेक परिसर दाट धुक्यात हरवला आहे. संततधार पावसासह दाट धुक्यात पर्यटक फिरण्याचा आनंद लुटत आहे. वेण्णा लेक मध्ये पर्यटक बोटिंगचा आनंद घेण्यासाठी गर्दी करत आहे. बोटिंग सह घोडे सवारी करत आहेत. त्याच प्रमाणे गरमा गरम मकई व पकई पॅटीस चा स्वाद घेत आहेत
महाबळेश्वर मधील सर्वात उंच धबधबा म्हणून ओळखला जाणारा लिंगमळा धबधबा म्हणजे पर्यटकांना पर्वणीच असते. लिंगमळा धबधबा व नयनरम्य निसर्ग पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. प्रतापगड कडे जाताना आंबेनळी घाटात ठीक ठिकाणी उंचावरून कोसळणाऱ्या लहान मोठ्या धबधब्यावर देखील पर्यटक पहावयास मिळत आहेत. बाजारपेठ व विविध पॉईंटवर पर्यटकांची गर्दी वाढत आहे.
महाबळेश्वर पांचगणी रोडवर पर्यटकांना वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी वाहतुकी संत गतीने सुरू आहे. महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावर असंख्य खड्डे असल्याने पर्यटकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ समोर आला आहे.