सातारा शासकीय रुग्णालयातील अनागोंदी कारभाराविरोधात आ.शिंदे झाले आक्रमक.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
सातारा शासकीय रुग्णालयातील अनागोंदी कारभाराविरोधात आ.शिंदे झाले आक्रमक.
सातारा दि: महाराष्ट्रात ज्या नेत्यांनी क्रांती केली ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नावाने असलेले सातारा येथील शासकीय रुग्णालयात सध्या अनागोंदी कारभार सुरू आहेत. अनेकांच्या तक्रारीत पाहून व्यथित झालेल्या आमदार शशिकांत शिंदे यांनी आज थेट शासकीय रुग्णालय गाठले. यावेळी शासकीय रुग्णालयातील ज्या कर्मचाऱ्यांबद्दल तक्रार होती.त्यांना अक्षरशः पळवून लावण्यात आले. त्यामुळे अखेर शासकीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांच्याशी चर्चा केली . आक्रमक झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व महिला पदाधिकारी यांनी कारभारात सुधारणा न झाल्यास लोकसभा निवडणूक न पाहता तीव्र आंदोलन केले जाईल. असा इशारा दिला आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा शासकीय रुग्णालयामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार सुरू आहे. या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये हलगर्जीपणा दिसून आलेला आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळले जाते. ही बाजू जरी असली तरी सध्या शासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सुविधा देण्याची जाहिरात बाजी केली जाते. त्यामुळे एक रुग्ण पाच ते सात केस पेपर काढतो. अनावश्यक असणाऱ्या तपासणी सातत्याने केली जाते. याचा परिणाम शासकीय सेवेवर झालेला असून अनेक यंत्रणा बंद पडतात. आवश्यक आहे अशाच रुग्णांची तपासणी होणे गरजेचे आहे. परंतु, सध्या राज्य शासनाने मोफत व विनाशुल्क हा शब्द प्रयोग केल्यामुळे ज्या ठिकाणी पूर्वी ३०० रुग्ण होते. आता केस पेपरची दररोज पाचशे ते ते सातशे पर्यंत पोहोचलेली आहे.
विशेष म्हणजे एवढ्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची यंत्रणा सातारा शासकीय रुग्णालयात नाही. दिव्यांग यांना देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्राबाबत पैसे दिले की टक्केवारी वाढते. आणि ज्यांची टक्केवारी आहे पण पैसे देत नाहीत. त्यांची टक्केवारी कमी करण्याची यंत्रणा राबवण्यात येत आहे. अनेकांनी ईव्हीएम मशीन बाबत तक्रार केली तशीच तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते अतुल शिंदे, गोरख नलावडे व समीर घाटगे यांनी शासकीय रुग्णालयातील तपासणी यंत्रणेबाबत केलेली आहे .या यंत्रणेतून खोटे रिपोर्ट येतात. असे आरोप करण्यात आला.
दरम्यान, याबाबत आमदार शशिकांत शिंदे यांनी सातारा शासकीय रुग्णालयात किती रुग्ण येतात ? किती औषध उपलब्ध होतात ? किती स्टाफ कमी आहे ? शासकीय सेवा देताना रुग्णांना त्रास सहन करावा लागतो.
याबाबत उपाययोजना काय केल्या ? याबाबतचा जाब विचारला. त्यावेळेला जिल्हा शल्य चिकित्सा व इतर वैद्यकीय अधिकारी निरुत्तर झाले होते. वास्तविक पाहता रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणे. हा मानवता धर्म आहे. पण जर सुविधांचा अभाव असेल तर रुग्णांची सेवा करण्यास मर्यादा येते याची जाणीव आहे .सध्या राज्य शासन खोटं बोला पण रिटर्न बोला.. अशा पद्धतीने वागून जनतेची दिशाभूल करत आहेत. विविध योजनांची जाहिरात करणे पण त्या योजना ग्रामीण भागात राबवल्या जातात का? याची कोणतीही तपासणी होत नाही. ऑडिट होत नाही .याबाबत राज्य शासनाला जाब विचारला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
सातारा जिल्हा रुग्णालयात आयसीयू मध्ये 65 बेड आहेत पण रुग्णांची संख्या 90 आहे आर्थिक टंचाईने शासकीय रुग्णालय मरण कला सुचत आहे निधी नाही ही बाब सुद्धा पुढे आलेली आहे या वेळेला राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष समिंदरा जाधव युवक जिल्हाध्यक्ष मकरंद बोडके गौरव माने शैलजा कदम नलिनी जाधव तेजस्विनी केसरकर प्रज्ञा गायकवाड विजय बोबडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते.
———————————————
फोटो -सातारा शासकीय रुग्णालयात आमदार शशिकांत शिंदे यांनी विचारला जाब… (छाया- अजित जगताप, सातारा)