आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा जिल्हा पर्यटन छायाचित्र प्रदर्शन – सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

1) सातारा जिल्हा पर्यटन छायाचित्र प्रदर्शन –
सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन.

सातारा दि. 1 : जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या मेहनतीतून साकारलेल्या सातारा जिल्हा पर्यटन छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या वतीने सातारा येथे 1 ते 4 जानेवारील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येथे सातारा येथे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन शाहु क्रीडा संकुल येथे मांडण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याला संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अखील भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्यवाहक सुनीताराजे पवार आदी उपस्थित होते.
हे प्रदर्शन अत्यंत सुंदर व सातारा जिल्ह्यातील गड किल्ले, ऐतिहासिक, सांस्कृतिक पर्यटन स्थळे यांचे समग्र दर्शन घडविणार आहे. चार दिवसांच्या साहित्य संमेलनामध्ये हजारो साहित्यीक रसिक संमेलनासाठी येणार आहेत. त्यांना सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहित या ठिकाणी छायाचित्रांच्या माध्यमातून उपलब्ध होईल यातून जिल्ह्याच्या पर्यटन वाढीस मदत होईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भोसले यांनी व्यक्त केला.
महाबळेश्वर पाचगणी बरोबरच या सर्व पर्यटन स्थळांचा आस्वाद या छायाचित्रांमधून आपल्याला मिळतो. हे प्रदर्शन कायमस्वरूपी जिल्हाधिकारी कार्यालयात मांडण्यात येणार आहे असे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले. शासकीय इमारती या केवळ शासकीय इमारतींच्या भिंती या केवळ भिंती न राहता त्या जिवंत व्हाव्यात आणि त्यांनी आपला इतिहास, आपली संस्कृती, आपलं निसर्ग सौंदर्य याविषयी या ठिकाणी येणाऱ्यांशी हितगुज करावं यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची ही संकल्पना खरोखरच नाविन्यपूर्ण आहे. हे प्रदर्शन अत्यंत अल्प कालावधीमध्ये उभे करण्यात जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अत्यंत मोलाचे सहकार्य आहे. यामध्ये जिल्ह्यातील नामवंत छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचा समावेश आहे.
यामध्ये महाबळेश्वर मधील विविध पर्यटन स्थळे, पाचगणी, वाईचे गणपती मंदिर आहे. प्रतापगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, भवानी मातेचे मंदिर, शिवकालीन दगडी पूल, सज्जनगड, तिच्यावरील रामदास स्वामींची समाधी, पाटेश्वर जे केवळ साताऱ्यापासून 14 किलोमीटर अंतरावरच आहे या ठिकाणी इतकी असंख्य शिवलिंगे आहेत. तितकी शिवलिंगे अन्यत्र कोठेच आपल्याला दिसणार नाहीत. यासह शिलालेख, दीपमाळ, तलाव आहेत. केळवली, ठोसेघरचा धबधबा, शिखर शिंगणापूर मंदिर, चाळकेवाडी इथल्या पठारावरील पवन ऊर्जा प्रकल्प, अनेक विविध रंगांनी फुललेले कासचे पठार, कासचा तलाव, सातारा येथील अजिंक्यतारा, कराड जवळची आगाशिवची लेणी, प्रीतीसंगम, मेनवलीचा घाट, कोयना धरणाचा परिसर, बामनोली,तापोळा इथले वॉटर स्पोर्ट्स, पाली, क्षेत्र माहुली, संगमाहुली, जबलेश्वर या ठिकाणची मंदिरे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नायगाव येथील जन्मस्थळ, 12 व्या शतकातील बांधलेली नकट्या रावळाची विहीर, धोमचे मंदिर, लिंब येथील बारामोटेची विहीर, औंध आणि सातारा येथील वस्तुसंग्रहालय, कोयना अभयारण्य, त्यातली वनसंपदा अशा अनेक विषयांवरील छायाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. जी पहात असताना खरोखरच पाहणाऱ्याची तहानभूक हरपून जाते.

2) साताऱ्यात साहित्य संमेलनामुळे अतिक्रमण झाले कुलूप बंद… सातारकरांनी मानले आयोजकांचे आभार….

सातारा दि: छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा शहराला पेन्शनरचे गाव असे सांगितले जात होते. परंतु, सध्या वाढत्या अतिक्रमणाने सातारची ओळख अतिक्रमणाच्या विळख्यातील शहर अशी बनवली गेली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामुळे साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियम परिसरातील अतिक्रमण कुलूप बंद झाले आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेची अपेक्षा ठेवणाऱ्या नागरिकांनी संमेलनाच्या आयोजकांचे मनापासून आभार मानले आहेत. संमेलन संपल्यानंतर हे कुलूप उघडले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे जिल्हा प्रशासन व नगरपालिकेचे खास वैशिष्ट्य ठरले आहे.
याबाबत माहिती अशी की ,सातारा नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलली जात असल्याने प्रशासकीय कारभार सुरू होता. आता संपूर्ण नगरपालिका राज्य व केंद्रात भाजपचे सरकार आल्यामुळे सर्वसामान्य माणसांना अच्छे दिन नको पण अतिक्रमण मुक्त सातारा एवढीच माफक अपेक्षा होती. ती फोल ठरलेली आहे. सातारा नगरपालिकेचे आता अतिक्रमणाचे समर्थन करणारे मसीहा निवडून आल्यामुळे सामान्य माणसांना फुटपाथ शोधणे अवघड झाले आहे. सातारा बस स्थानक परिसरात तसेच नाक्याभोवती मोठ्या प्रमाणात अतिक्रमण बोकाळे आहे .तरी सातारा नगरपालिका अतिक्रमण विभाग गांधारीची भूमिका सोडण्यास तयार नाही.


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून अनेक जण सातारा शहराला भेट देत आहेत. अशा वेळेला सातारा नगरपालिकेची अब्रू चव्हाट्यावर जाऊ नये. यासाठी अतिक्रमणवाल्यांनाच विनंती करून त्यांची दुकानदारी बंद करण्यास लावण्यात आली आहे. या अतिक्रमणातून मोठे अर्थकारण होत असले तरी या अतिक्रमणाच्या माध्यमातून काही बेरोजगार व प्रामाणिक व्यवसाय करणारे ही व्यवसायिक आहेत. त्यांचे योग्य पुनर्वसन मानवता भावनेतून झालेच पाहिजे. याबद्दल कुणाची ही दुमत नाही. परंतु, काही अतिक्रमण धारक दुहेरी संकटात सापडले आहेत. एका बाजूला प्रशासकीय व लोकप्रतिनिधी समर्थक हप्ते खोरी आणि दुसऱ्या बाजूला गुंडांना खंडणी देऊन तिसरा भाग हा उपजीविकेसाठी वापरावा लागत आहे. याबद्दल आता सामुदायिकरित्या आवाज उठवणे गरजेचे आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून संयोजकांनी खूप मोठी चांगली भूमिका अदा केली आहे. विशेष म्हणजे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आनंदोत्सत्व साजरा करणारे मूग गिळून गप्पगार पडले आहेत. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने तीन दिवस अच्छे दिन आल्यामुळे ही किमया फक्त मराठी साहित्य संमेलन आयोजकांनी केली आहे. त्यामुळे त्यांचे शांतता प्रिय नागरिकांनी आभार मानलेले आहेत. आता सातारा नगरपालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांनी हिम्मत असेल तर आपल्या प्रभागातील अतिक्रमण दूर व्हावे. यासाठी सभागृहात आवाज उठवला तर काहींना निवडणुकीत दारू व पैसा वाटून तसेच दहशत माजवून निवडून येण्याची गरज भासणार नाही. असे राजकीय निरीक्षक व निवडणूक अभ्यासकांनी सांगितले.

_____________
चौकट – सातारा शहरांमध्ये राज्याचे नेतृत्व करणारे तीन मंत्री व दोन खासदार आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी राहत आहेत . त्यांच्याकडे अनेकदा सातारा शहरातील अतिक्रमणाबाबत तक्रारी झालेल्या आहेत. तसेच सामाजिक बांधिलकी राखणाऱ्या काही वृत्तपत्राने ही मालिका लिहिलेले आहेत. तरीसुद्धा अतिक्रमण काढता येत नाही. ही खरं म्हणजे सातारकरांची शोकांतिका आहे. यापेक्षा बिहार मधील पटना बरे असं म्हणण्याची वेळ आली आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

 

 

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button