सातारा:-सेवानिवृत्त शिक्षक व केंद्रप्रमुख यांच्या आर्थिक प्रश्नांची मुख्यमंत्री यांनी घेतली दखल: अनिलकुमार कदम.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष
RPS STAR NEWS
सेवानिवृत्त शिक्षक व केंद्रप्रमुख यांच्या आर्थिक प्रश्नांची मुख्यमंत्री यांनी घेतली दखल: अनिलकुमार कदम.
सातारा :-सातारा जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षक व केंद्रप्रमुख यांचे सेवावृत्तीचे उपदानाची रक्कम व पेन्शन अंशराशीकरण, गटविमा रक्कम गेली सहा महिन्यांपासून अद्याप मिळालेली नाही.याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल सेवानिवृत्त संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार कदम यांनी ई मेल व्दारे दिनांक १३ डिसेंबर रोजी मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठवलेले होते.
महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल सेवानिवृत्त संघटनेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षक व केंद्रप्रमुख यांच्या प्रलंबित असलेल्या सेवावृत्तीचे उपदानाची रक्कम, पेन्शन अंशराशीकरण व गटविमा रक्कम अद्याप मिळालेली नाही त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षक व केंद्रप्रमुख यांच्या आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत.अनेक सेवानिवृत्त शिक्षक व केंद्रप्रमुख यांना खाजगी कर्ज काढून उदरनिर्वाह करावा लागत आहे.सेवानिवृत्त शिक्षक व केंद्रप्रमुख यांचे सेवानिवृत्त उपदान रक्कम व पेन्शन अंशराशीकरण रक्कम,गटविमा रक्कम वेळेत मिळणे आवश्यक होते तरीसुद्धा सहा महिने पासून सातारा जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षक व केंद्रप्रमुख सदरच्या आर्थिक लाभापासून वंचित आहेत.याबाबतचे लेखी निवेदन ई मेल व्दारे महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल सेवानिवृत्त संघटनेचे संस्थापक राज्य अध्यक्ष अनिलकुमार कदम यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठवलेले होते.
महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल सेवानिवृत्त संघटनेच्या माध्यमातून पाठवलेल्या अनिलकुमार कदम यांच्या ई मेल ची तातडीने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी दखल घेतली आणि त्वरीत कार्यवाही करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांना दिलेले आहेत.त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षक व केंद्रप्रमुख यांना नजिकच्या काळात आर्थिक दिलासा मिळेल अशी आशा आहे.
सातारा जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षक व केंद्रप्रमुख सेवानिवृत्त उपदान रक्कम व पेन्शन अंशराशीकरण रक्कम, गटविमा रक्कम कधी मिळणार या विवंचनेत असल्याचे चित्र सातारा जिल्ह्यात दिसून येते आहे.मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी तातडीने दखल घेऊन दिलेल्या आदेशानुसार कधी कार्यवाही होईल याकडे सातारा जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षक व केंद्रप्रमुख यांचे लक्ष लागून राहिले आहे.
सातारा जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षक व केंद्रप्रमुख यांच्या आर्थिक प्रलंबित प्रश्नांची दखल मुख्यमंत्री कार्यालयातून घेतल्या बद्दल सातारा जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षक व केंद्रप्रमुख यांनी समाधान व्यक्त केले आहे तसेच महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल सेवानिवृत्त संघटनेने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे अभिनंदन केले आहे.