कराड:-आदर्श प्राथमिक शाळा कराडमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा.
प्रतिनिधी :-रफिक शेख:-9021132121

प्रतिनिधी :-रफिक शेख:-9021132121
आदर्श प्राथमिक शाळा कराडमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा.
कराड, दि. 14 (रफिक शेख) :- आदर्श प्राथमिक शाळा कराड मधील लहान मुला मुलीनी बहिण भावाचे प्रतिक समजल्या जाणाऱ्या रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला माझी रक्षा करण्यासाठी बंधनात घालून रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला.
भावाने बहिणीची रक्षा करावी यासाठी पुरातन काळापासून चालत आलेल्या रक्षाबंधन दिवशी आदर्श प्राथमिक शाळा कराड मधील इयत्ता पहिलीच्या लहान मुला मुलींचा बहिण भाव होण्याचा आनंद गगणात मावेनासा झाला.
यावेळी शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्यासाठी रक्षाबंधन आणि रंगभरणेची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मुला मुलीनी आपल्याला मिळालेल्या चित्रांमध्ये वेगवेगळे रंग भरुन त्याचा आनंद घेतला.
शाळेमधील हा रक्षाबंधनाच्या कार्यक्रम व्यवस्थित रितीने पार पडण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर वर्गाने मोलाचे सहकार्य केले असून यात संगीता साळुंखे मॅडम, मुख्याध्यापिका मॅडम, सर्व शिक्षक शिक्षिका आदींचा सहभाग लाभला.