पुणे पिंपरी:-डॉ. डी. वाय. पाटील पब्लिक स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
डॉ. डी. वाय. पाटील पब्लिक स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी.
पिंपरी, दि. 20 (शफिक शेख) :- येथील डॉ. डी. वाय. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘शिवजयंती’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी व शिक्षक अतिशय उत्साहाने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात उपप्राचार्या सौ. ज्योती झोपे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून केली. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, दादोजी कोंडदेव, मावळे यांच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या वेशभूषांनी संपूर्ण वातावरण शिवकालीन झाले होते. या कार्यक्रमात इ. ३री व ८वी च्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांबद्दल माहिती सांगितली. तसेच ‘स्वराज्य स्थापनेची शपथ’ यावर नाटिका इ. ५वी ते ७वी च्या विद्यार्थ्यांनी सादर केली. तसेच राज आलं..राज आलं.. हे शिवाजी महाराजांवरील गीत विद्यार्थ्यांनी सादर केले.
सौ. झोपे यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित काही प्रश्नोत्तरे विचारून सर्व सहभागी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी इतिहास विभागाच्या सर्व शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली होती. या कार्यक्रमासाठी बीना सहानी, रामदास चव्हाण, अनिता पीटर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, उपाध्यक्षा डॉ. सौ. भाग्यश्री पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, श्री. संदीप राणे उपस्थित होते.