पुणे पिंपरी:-वाकड, ताथवडे, पूनावळे प्रभागातून नाना काटे यांना ५ हजाराचे लीड देणार – कलाटे
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
वाकड, ताथवडे, पूनावळे प्रभागातून नाना काटे यांना ५ हजाराचे लीड देणार – कलाटे
पिंपरी, दि. २० (शफिक शेख) :- ‘मिंधे’ गटाला हाताशी धरून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला धडा शिकविण्याची संधी चिंचवड पोटनिवडणुकीच्या निमित्ताने चालून आली आहे. त्यामुळे भाजपाच्या पराभवासाठी चिंचवड मतदार संघातील ज्येष्ठ शिवसैनिक सरसावले असून वाकड, ताथवडे, पुनावळे परिसरातून नाना काटे यांना किमान पाच हजाराचे मताधिक्य देण्याचा निर्धार तारामन (अण्णा) कलाटे यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ शिवसैनिकांनी केला आहे.
यावेळी बोलताना कलाटे म्हणाले, ‘भारतीय जनता पक्षाने आमच्या अस्मितेवर हल्ला केला आहे. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने कार्यकारी प्रमुख बनलेल्या उध्दव ठाकरे यांना कटकारस्थान करुन तसेच खोक्यांचा वापर करून मुख्यमंत्री पदावरून उतरवले. त्याचा बदला घेण्यासाठी संपूर्ण शिवसेना मैदानात उतरली आहे. उध्दव टाकरे यांच्याशी केलेली गद्दारी हा महाराष्ट्र विसरणार नाही. भाजप उमेदवाराला पराभूत केल्याशिवाय आमचा एकही शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही’, असेही कलाटे म्हणाले.
यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील, माजी नगरसेवक मयूर कलाटे, रेखा दर्शीले, संदीप पवार, सुप्रिया पवार, विजय दर्शिले, माजी सरपंच लक्ष्मण मोहिते, संभाजी शिंदे, सागर ओव्हाळ, राजाराम काटे, प्रकाश काटे, सुरेश रानवडे, किरण बोरगे, सुभाष कोयते, शिवाजी बांदल, अतुल काटे, सचिन झिंजुर्डे, राहुल काटे, ईश्वर ओव्हाळ, राजेंद्र गायकवाड, शांताराम बोडके, बाळासाहेब बोडके, अक्षय भुजबळ, श्रीकांत ढवळे, सुनील ढवळे यांच्यासह पुनावळेतील राष्ट्रवादी काँग्रेस व असंख्य शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.
आबांची आठवण आणि रोहितचा विश्वास
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. आबांची आठवण करून देणाऱ्या शैलीत त्यांनी ही निवडणूक भावनिकतेच्या जोरावर लढणाऱ्या भाजपावर चांगलेच प्रहार केले. प्रकृती अस्वस्थ असताना रुग्णवाहिकेतून लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना ऑक्सिजन लावलेल्या अवस्थेत मतदानाला मुंबर्ईला नेले. खासदार गिरीश बापटांना अत्यवस्थ असताना प्रचारात उतरवले. हा सत्तापिपासूपणा कमी झाला की काय म्हणून आता भावनिकतेची साद घालत आहेत, अशी भाजपवर टीका करून विकासकामांच्या जोरावरच राष्ट्रवादी काँग्रेस विजयी होईल, असे रोहीत पाटील यांनी सांगितले.