श्रीरामपुर:-नाऊर येथे पंधरा दिवसात तीन मोटारसायकलींची चोरी.
पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपुर:-9921435437

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
देविदास गायकवाड श्रीरामपुर
नाऊर येथे पंधरा दिवसात तीन मोटारसायकलींची चोरी.
श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील अकील अब्बास पटेल यांच्या मालकीची बजाज प्लॅटिना दुचाकी (क्रं. एमएच 17 बीआर.9728) गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राहत्या घराजवळून रात्री 12 ते 12.30 वाजेच्या सुमारास चोरी झाली. गावामध्ये मोटारसायकलचोरांनी उच्छाद मांडला असून गेल्या पंधरा दिवसातील मोटरसायकल चोरीची ही तिसरी घटना घडल्याने वाहन मालक भयभीत झाले आहे. त्यामुळे या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.
गेल्या महिनाभरापूर्वीच निमगाव खैरी येथील अॅड. दिनेश पुंड तसेच नाऊर येथील पत्रकार संदीप जगताप यांच्या नवीन ट्रॅक्टरच्या बॅटरीची चोरी झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर नवाज पटेल यांचे पाथर्डी येथील स्नेही समीर पठाण यांची होंडा कंपनीची शाईन (एमएच 20 ईएक्स 8751) या गाडीची चोरी झाल्याची घडना ताजी असतानाच लगेच दुसर्याच दिवशी शिक्षक अरुण शिंदे यांच्या बजाज डिस्कव्हर गाडी (क्रं. एमएच 17 एयू 4060) या दोन मोटरसायकल चोरीच्या घटना घडल्या होत्या. या चोरांचा अद्याप तपास लागलेला नाही तोच काल रात्रीही सोनवणे नामक व्यक्तीच्या गाडीचा लॉक तोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र तरुणांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फसला.दरम्यान, येथील जागरूक नागरिक जावेद पटेल यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेशी संपर्क साधत नागरिकांना चोरीची कल्पना दिल्याने नागरिक उपस्थित झाले तर अवघ्या काही मिनिटात तालुका पोलीस ठाण्याची गाडी देखील तत्पर पोहोचली. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार सतिश गोरे, हेड कॉन्स्टेबल साजिद पठाण, पोलीस नाईक संतोष बढे, होमगार्ड श्री. सोनवणे आदीनी संशयित असणार्यांचा घरी शोध घेतला असता ते मिळून न आल्याने त्यांच्या कुटूंबातील व्यक्तींकडून चौकशी केली.
गाडी व बॅटरी विकत घेणारा कोण ?
गावामध्ये एक दरोडा वगळता अद्याप चोरी झाली नसल्याचे नागरिकांमधून बोलले जात होते. मात्र ट्रॅक्टरच्या बॅटरीनंतर एका पाठोपाठ सलग तीन मोटारसायकलची चोरी झाली. या चोरांचा बंदोबस्त करावा, या तरुणांकडून गाड्या, बॅटरी खरेदी करणारा मास्टरमांईड नेमका वैजापूरचा कि श्रीरामपूरचा? त्याची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.