ताज्या घडामोडी

सातारा जिल्हा बँकेच्या वार्षिक नफ्यामध्ये विक्रमी वाढ.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

सातारा जिल्हा बँकेच्या वार्षिक नफ्यामध्ये विक्रमी वाढ.

सातारा दि: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पारदर्शक कारभाराने पुन्हा एकदा बँकेचा नावलौकिक वाढवला असून सन २०२४- २५ आर्थिक वर्षाचे बँकेत कर पूर्व नफा २३३ कोटी४७ लाख रुपये झाला. करोत्तर नफा १९७ कोटी८८ लाख झाल्याची आनंदाची बातमी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन नितीन पाटील व व्हाईस चेअरमन अनिल देसाई यांच्यासह सर्व संचालक आणि बँकेच्या सर व्यवस्थापक डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी सातारा येथे भरगच्च झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
सहकार क्षेत्रामध्ये एक आदर्श बँक असा संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या सातारा जिल्हा बँकेने पारदर्शक व शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतले .एक आदर्श बँक सातारा जिल्हा बँकेने आपल्या ७५ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये यशस्वी मार्गक्रमण केले आहे.
सातारा जिल्हा बँकेच्या ११,४६८ कोटी २४ लाख ठेवी,७५९३ कोटी ७४ लाख कर्ज वितरण असा समिश्र व्यवसाय १९,०६१ कोटी ९८ लाख रुपये पर्यंत वाढवण्यात यश मिळवले आहे. जिल्हा बँकेच्या स्व निधीमध्ये ८२ कोटी ९६ लाख इतकी वाढ झाली . बँकेचे एकूण स्व निधी १०६० कोटी २८ लाखापर्यंत पोहोचली आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सरकारी कर्जरोखे आणि बँकांमध्ये सुरक्षित गुंतवणूक सात हजार पाचशे आठ कोटी ३९ लाख केली आहे. विशेष बाब म्हणजे गेली १८ वर्ष शून्य टक्के निव्वळ अनुत्पादक कर्ज (एन.पी.ए.) राखण्यात यश मिळवले आहे. ही आर्थिक भक्कम बाजू असल्याने सातारा जिल्हा बँकेच्या आर्थिक भक्कम इमारत म्हणजे शेतकऱ्यांनी दाखवलेला विश्वास आणि संचालक मंडळाने घेतलेला निर्णय तसेच जिल्हा बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आणि त्यांना समर्थ साथ लाभलेले विकास सेवा सोसायटी व सहकारी संस्था यांचे हे सामुदायिक यश आहे. या बँकेने शेतकरी सभासदांच्या हितासाठी शेतकरी सभासदांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी शिक्षण कालावधीत शून्य टक्के व्याज दराने शैक्षणिक कर्ज पुरवठा करणारी देशातील पहिली बँक हा बहुमान मिळवला आहे. त्याचबरोबर व्याज परतावा आणि सोसायटीच्या मालकीच्या इमारतीसाठी सुद्धा निधीची तरतूद केलेली आहे .विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून उत्कृष्ट वसुली करणाऱ्या सोसायट्यांना व जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांनाही वेतन वाढ आणि लाभ मिळवून दिलेला आहे.
बँकेने अनेक विधायक उपक्रम राबवताना प्रत्येक संस्थेस विशेष अशी भरीव तरतूद करून त्यांच्या कामाची दखल घेतली आहे. सेवक कल्याण निधी आणि राखीव निधीतून ५६ कोटी ३१ लाखापर्यंत तरतूद केली आहे. संशयित बुडीत कर्ज निधीसाठी २४ कोटी एक लाख इतकी भरीव तरतूद केलेली आहे. जे सभासद वेळेस व्याज भरतात. त्यांच्यासाठी व्याज परतावा. असे विधायक उपक्रम राबवत आहे. बँकेने ऑडिट वर्ग अ प्राप्त केल्यामुळे व कर्ज वसुली ९५ टक्के पेक्षा अधिक असल्याने जिल्हा बँकेचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्रात घेतला जात आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जेष्ठ संचालक व महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले, माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह संचालक राजेंद्र राजपुरे ,कांचन साळुंखे, दत्ता नाना ढमाळ, प्रभाकर घार्गे, प्रदीप विधाते, शिवरूपराजे खेडेकर, ज्ञानेश्वर रांजणे, सुनील खत्री, ऋतुजा पाटील, रामभाऊ लेंभे, युवराज जाधव, सचिन सावंत व बँकेचे अधिकारी वर्ग आणि चेअरमन व चेअरमन, सर व्यवस्थापक यांची खूप मोठे योगदान लाभलेले आहे. ठिबक सिंचन संच उभारणीसाठी व पाण्याच्या बचतीसाठी शेतकरी सभासदांना प्रति एकर पाच हजार रुपये ठिबक सिंचन अर्थसहाय्य योजना पुन्हा सुरू केलेली आहे.
सातारा जिल्ह्यातील ९६० सोसायटीच्या पैकी उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांनाही पुरस्कार देण्याचा निर्णय घेतलेला आहे. एकूणच सातारा जिल्हा बँकेच्या आर्थिक वर्षांमध्ये उत्कृष्ट व्यावसायिक यश संपादन केल्याबद्दल शेतकरी सभासदांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

______________________
फोटो सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रगती बाबत माहिती देताना चेअरमन , व्हॉइस चेअरमन व ज्येष्ठ संचालक (छाया– अजित जगताप, सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button