क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

मुंबई:-मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारीच्या ‘छापा काटा’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर!

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 

मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारीच्या ‘छापा काटा’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर!

 

मुंबई: अभिनेते मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी ते मराठीतले अनेक तगडे स्टार असणारा अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत ‘छापा काटा’ चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात जोरदार धमाका उडवला होता. ‘छापा काटा’ चित्रपटाचा १९ जानेवारी २०२४ रोजी अल्ट्रा झकास या अस्सल मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार असून रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा या चित्रपटाच्या मनोरंजनाचा विलक्षण अनुभव मिळणार आहे.

 

चित्रपटाची निर्मिती श्री. सुशीलकुमार अग्रवाल यांनी केली असून पटकथा आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केली आहे. अभय जोधपुरकर, आर्या आंबेकर, सुनिधि चौहान आणि आदर्श शिंदे यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजातील गीतांने प्रेम, भावना आणि उत्साहाचा जबरदस्त संगम जुळून आला आहे. चित्रपटातील या सुमधुर गीतांना सुप्रसिद्ध संगीतकार मुकेश काशीकर आणि गौरव चाटी यांनी आपल्या संगीत कौशल्याने संगीतबद्ध असून गाण्यांना रसिक प्रेक्षकांचा संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.

 

लोकांना वेड्यात काढून पॉलिसी विकणारा करामती नाम्या बहिणीच्या लग्नासाठी श्रीमंत शनयाशी लग्नाचा करार करतो खरा, पण हा नकली लग्नाचा करार नाम्या आणि शनायाच्या कुटुंबात काय धमाल विनोदी गोंधळ घालणार आणि त्या कराराचं पुढे काय होणार हे चित्रपटात पहायला मिळणार आहे. नाम्या म्हणजेच मकरंद अनासपूरे आणि श्रीमंत मुलगी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी असून मोहन जोशी, अरुण नलावडे, ऋतुराज फडके, पंकज विष्णु, सुश्रृत मंकणी, रीना अग्रवाल आणि विजय पाटकर या सुप्रसिद्ध अभिनेत्यांच्या विनोदाचा डबल धमाल चित्रपटात पहायला मिळणार आहे.

 

“मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांच्या जोडीला कायमच प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद असून त्यांच्या विलक्षण जोडीचा हा सहावा चित्रपट आहे. सहकुटुंब मनसोक्त आनंद घ्यावा असा ‘छापा काटा’ प्रेक्षकांना सुपूर्त करताना आनंद होत आहेच, त्याबरोबर प्रेक्षकांचा प्रतिसाद जाणून घेण्याची उत्सुकता आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी :- https://www.ultrajhakaas.com/marathi-movies

 

प्रसिद्धी जनसंपर्क प्रमुख : राम कोंडीलकर

संपर्क : ९८२१४९८६५८

इमेल : ramkondilkar.pr@gmail.com

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button