आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी राज्यात महिला सशक्तीकरण अभियानाला सुरुवात.

 पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा ACLS CHIEF रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा ACLS CHIEF रिपोर्टर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी राज्यात महिला सशक्तीकरण अभियानाला सुरुवात.

 

यानिमित्त महिलांसाठी ‘नारी शक्ती दूत’ या अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले. राज्य सरकारतर्फे महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध सरकारी योजना, विविध घोषणा आणि उपक्रमांची माहिती या माध्यमातून महिलांपर्यंत पोहोचवण्याचा महिला व बालविकास विभागाचा मानस असल्याचे सांगण्यात आले.
महिलांसाठी नारी शक्ती दूत
या अ‍ॅपच्या माध्यमातून कोणत्या योजना लागू होतील, याबाबतची माहिती गरजू महिलांपर्यंत पोहोचवली जाईल, असे महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. राज्य सरकारतर्फे महिलांसाठी दरवर्षी विविध योजना आणि प्रकल्प राबविण्यात येतात. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. या विविध योजना नेमक्या काय आहेत, त्याची पात्रता काय, यांसारख्या अनेक प्रश्नांमुळे बऱ्याच योजना महिलांपर्यंत पोहोचत नसल्याची तक्रार महिला व बालविकास विभागाकडे प्राप्त झाली होती. त्यानंतर तटकरे यांच्या सूचनेनुसार ‘नारी शक्ती दूत’ अ‍ॅप तयार करण्यात आले आहे.

नमो महिला सशक्तीकरण कार्यक्रमासाठी नारी शक्तीची पायपीट, उन्हाचा त्रास, जेवणाचीही गैरसोय

या अ‍ॅपद्वारे राज्यातील महिलांना त्यांच्या संदर्भातील विविध योजनांची माहिती नोटिफिकेशन आणि इतर माध्यमातून पुरविण्यात येणार आहे. त्याशिवाय योजनांच्या विविध बातम्याही यावर उपलब्ध असतील. महिला व बालविकास विभागाच्याच नव्हेत, तर सरकारच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या महिलांसाठीच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट असल्याचे तटकरे यांनी नमूद केले. अ‍ॅपमध्ये या विविध योजनांसाठी अर्ज करण्याची सुविधाही पुरविण्यात येणार आहे. अ‍ॅप आणि वेबपोर्टलसाठी विशेष डॅशबोर्ड तयार करण्यात आला असून, अँड्रॉइडआधारित मोबाइलवरच सध्या ही सुविधा असल्याचे सांगण्यात आले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button