श्रीरामपूर:-कष्टाचे लाखो रुपये अडकले संत नरहरी ‘ च्या आरोपींना अटक करण्यासाठी श्रीरामपुरात ठेवीदारांचे उपोषण सुरु.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
कष्टाचे लाखो रुपये अडकले
संत नरहरी ‘ च्या आरोपींना अटक करण्यासाठी श्रीरामपुरात ठेवीदारांचे उपोषण सुरु.
श्रीरामपूर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) ४२० चा गुन्हा दाखल होवूनही संत नरहरी सहकारी पतसंस्थेतील आरोपी मोकाट फिरत आहेत . त्यांना तातडीने अटक करावी या मागणीसाठी आज शनिवारी सकाळीपासुन शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर ठेवीदारांनी आमरण उपोषण सुरु केले आहे कुठल्याही परिस्थितीत आरोपींना अटक झाल्याशिवाय आता माघार नसल्याचा पवित्रा या ठेवीदारांनी घेतला आहे
श्री संत नरहरी सहकारी पत संस्थेच्या ठेवीदारांचे कष्ठीचे लाखो रुपये पतसंस्थेत अडकले असुन पतसंस्थेच्या अजी माजी संचालकांनी सदर ठेवीदारांना पैसे परत न करता त्यांची फसवणूक केल्याने आजी – माजी संचालकांसह १४ जणांविरुद्ध ४२० चा गुन्हा श्रीरामपूर शहर पोलिसात दाखल करण्यात आला आहे ५ दिवस उलटले तरी आरोपींना अटक नाही शिवाय आरोपींकडून ठेवीदारांना हस्ते परहस्ते धमकावले जाते त्यामुळे आज या ठेवीदारांनी श्रीरामपुरात आमरण उपोषण सुरु करण्याचा निर्णय घेतला . यामध्ये वृद्ध पुरुष . महिला यांचा सामावेश आहे विशेष म्हणजे अनेकांनी मुलांच्या शिक्षणासाठी . मुलीच्या लग्नासाठी तसेच म्हतारपणाच्या आजाराच्या औषधोपचारासाठी म्हणून आपली आयुष्यभराची पुंजी ही या पतसंस्थेत ठेव म्हणुन ठेवली होती . मात्र आपले हक्काचे . कष्टाचे पैसेच पतसंस्था चातकांनी देण्यास टाळाटाळ केल्याने आणि हे सर्व पैसे अडकुन पडल्याने ठेवीदार मेतकु टीस आले असून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे