आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:- एन एस एस स्वयंसेवकांनी शेंदुरजणे गावातून ज्योत फिरवून राजमाता जिजाऊंना केले अभिवादन किसन वीर मधील एन.एस. एसचा उपक्रम.

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

वाई दि. 13
एन एस एस स्वयंसेवकांनी शेंदुरजणे गावातून ज्योत फिरवून राजमाता जिजाऊंना केले अभिवादन
किसन वीर मधील एन.एस. एसचा उपक्रम.

 

दिनांक ०८ जानेवारी ते १४ जानेवारी या कालावधीत मौजे शेंदुरजणे येथे जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर चालू आहे. या कालावधीतच १२ जानेवारी रोजी युवा दिन व राजमाता जिजाऊंचा जन्मदिन असल्याने, जन्मदिनाचे ओैचित्य साधून जिजाऊंच्या स्मृतींना अभिवादन करण्याचा मानस डॉ संग्राम थोरात यांनी बोलून दाखविला. त्यास एन एस एस च्या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यात शेंदुरजणे ग्रामस्थही सामील झाले. संदीप जगताप यांनी ज्योत आणून दिली. लक्ष्मीबाई वीर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय कुंभार यांनी ढोल, ताशा, लेझीम उपलब्ध करून दिली. गावकऱ्यांनी पालखी आणून दिली. एन एस एस मधील विद्यार्थिनींनी साड्या परिधान करून जिजाऊंच्या लेकी शोभाव्यात असा पोशाख केला.
त्यासाठी महाविद्यालायाचे प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे यांचे खंबीर पाठबळ मिळाले. प्रकल्प अधिकारी डॉ. संग्राम थोरात व डॉ. अंबादास सकट यांनी त्याचे नेटके नियोजन केले.
शेंदुरजणे गावाच्या ग्रामपंचायतीसमोर सगळे एकत्र जमले. ग्रामस्थ संजय भिकू जाधव यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करून ज्योत प्रज्वलित करण्यात आली. या उपक्रमात माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षकही सहभागी झाले. छ. शिवाजी महाराज की जय, राजमाता जिजाऊंचा विजय असो अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. शालेय विद्यार्थ्यांनी ढोल ताशा वाजवला तर एन एस एस स्वयंसेविकांनी लेझीम वर ठेका धरला. गावातील गल्ली बोळातून जाताना गावातील माता भगिनी सर्वांचे जोरदार स्वागत करीत होत्या व प्रतिमेचे पूजन करून स्वयंसेविकांचेही औक्षण करीत होत्या. गावातून ज्योत फिरवून आणल्या नंतर मुख्य चौकात लेझीम चा डाव मांडला व ज्योत सुशोभित रांगोळी काढून हनुमान मंदिरात ठेवली . या उपक्रमात कॅ. डॉ. समीर पवार, डॉ राजेश गावीत, डॉ महेश जाधव, नीलम भोसले, हर्षदा जाधव, सुनील दगडे यांनी भाग घेतला. दुपारी डॉ. मंजूषा इंगवले व सर्व महिला प्राध्यापकांनी येऊन राजमाता जिजाऊंना अभिवादन केले. याकामी स्वयंसेवक व स्वयंसेविकांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button