जावळी (मेढा)तालुक्यात बारावी भव्य बौद्ध धम्म परिषद – जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव यांनी आंबेडकरी विचारांचा रणशिंग फुंकल.
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

जावळी (मेढा)तालुक्यात बारावी भव्य बौद्ध धम्म परिषद – जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव यांनी आंबेडकरी विचारांचा रणशिंग फुंकल.

भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा पश्चिम विभाग व तालुका जावळी (मेढा) बामणोली विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका जावळी येथे बारावी भव्य बौद्ध धम्म परिषद प्रचंड उत्साहात व लढाऊ वातावरणात पार पडली. हा कार्यक्रम म्हणजे केवळ समारंभ नसून, बुद्ध–फुले–आंबेडकर विचारांचा उघड एल्गार होता.
या ऐतिहासिक परिषदेला
आदरणीय जगदीश गवळी (मा. केंद्रीय महासचिव),
आई. एन. एम. आगाने काका (मा. राष्ट्रीय सचिव),
मा. अरुण पोळ (ट्रस्टी, भारतीय बौद्ध महासभा),
अशोक भालेराव (सातारा जिल्हाध्यक्ष, पश्चिम विभाग),
सिताराम कांबळे (अध्यक्ष – धम्म परिषद),
भीमराव परिहार (अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा जावळी – प्रास्ताविक),
तात्या गाडी (सचिव, भारतीय बौद्ध महासभा जावळी तालुका),
चंद्रकांत खंडात (पश्चिम महाराष्ट्र माजी अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, सातारा जिल्हा)
यांची ठाम व जाज्वल्य उपस्थिती लाभली.
यावेळी चंद्रकांत खंडात यांनी आपल्या धारदार शब्दांत स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की,
“वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा या नाण्याच्या दोन बाजू असल्या तरी त्यांचा आत्मा एकच आहे. अन्यायाविरुद्ध संघर्ष आणि बहुजनांचा स्वाभिमान हाच आमचा अजेंडा आहे.”
त्यांच्या या स्पष्ट वक्तव्याने सभागृहात प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला.
सातारा जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव यांनी आपल्या जहाल भाषणात भारतीय बौद्ध महासभेला विरोध करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेत,
“बौद्ध चळवळीला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना इतिहासाने कधीच माफ केलेले नाही आणि पुढेही करणार नाही,”
असा थेट इशारा दिला.
आदरणीय जगदीश गवळी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धम्माशी असलेला वैचारिक, सामाजिक आणि क्रांतिकारी संबंध अत्यंत प्रभावीपणे उलगडून सांगितला. बुद्ध धम्म हा केवळ पूजा-पाठ नसून समता, न्याय आणि माणूसपणाचा लढा असल्याचे त्यांनी ठासून सांगितले.
या परिषदेत महिलांचा, युवकांचा आणि बालकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून शिक्षण हेच परिवर्तनाचे शस्त्र आहे हा संदेश ठामपणे दिला गेला.
ही परिषद म्हणजे मौन स्वीकारणाऱ्यांसाठी नाही, तर अन्यायाविरुद्ध उभे राहणाऱ्यांसाठीचा इशारा ठरली. जावळी तालुक्यातून उठलेला हा आवाज आता संपूर्ण सातारा जिल्ह्यात आणि पुढे महाराष्ट्रात घुमणार, यात शंका नाही.




