आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

साताऱ्यात महामानवाला अभिवादनासाठी सर्व समाज व संघटना एकवटल्या…

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) साताऱ्यात महामानवाला अभिवादनासाठी सर्व समाज व संघटना एकवटल्या…

(अजित जगताप)

सातारा दि:: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सातारा जिल्ह्यात सर्व समाज व संघटना राजकीय पक्ष एकवटल्या होत्या. खऱ्या अर्थाने डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचले आहेत. आता त्याचे आत्मचिंतन करून अनुकरण करणे हे आता काळाच्या हाती राहिले आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी जयंती निमित्त शुभेच्छा व अभिवादनाचे फलक चौकाचौकात लागले होते.

ग्रामीण भागामध्ये पददलीत, दलित, अल्पसंख्यांक, कष्टकरी, शेतमजूर वस्तीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन केले जात होते. अनेक ठिकाणी प्रतिमेंना पुष्पहार पुष्पचक्र अर्पण करून आंबेडकर आणि शुभेच्छा देण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यशानी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी,सातारा जि. प. अध्यक्ष डॉक्टर प्रियाताई शिंदे उपाध्यक्ष राजू भैया भोसले, समाजकल्याण उपायुक्त सुनील जाधव, सातारचे नगराध्यक्ष अमोल मोहिते उपनगराध्यक्ष डी.जी. बनकर यांच्यासह विविध संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी, रिपब्लिकन पक्ष, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन सेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेना कम्युनिस्ट पक्ष विद्रोही सांस्कृतिक मंच, फुले शाहू आंबेडकरवादी विचारांच्या संघटना यांच्यासह अनेकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा व प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या विचाराला अभिवादन केले. यावेळी सर्वत्र जय भीम चा नारा तसेच युगपुरुषांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. या कार्यक्रमाला समाजातील सर्व स्तरातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. सकाळी सहा वाजल्यापासूनच आंबेडकर आणि यांची डॉक्टर आंबेडकर पुतळ्यासमोर गर्दी जमली होती. या वेळेला शीतपेय व अन्नदान तसेच विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर मर्दानी खेळाची प्रात्यक्षिक दाखवण्यात आली. डॉक्टर आंबेडकर जयंती निमित्त ग्रंथ खरेदी व आंबेडकर चळवळीतील साहित्य विकत घेण्यासाठी पेपर स्टॉल वर गर्दी जमली होती. सातारा पत्रकार संघाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी ग्रंथ वाटण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, अमित वाघमारे, विठ्ठल हेंद्रे, तुषार तपासे, अजित जगताप, राहुल तपासे, गजानन चेनगे, ओमकार कदम, अजित सोनवणे, प्रमोद इंगळे, देवराज कामाठी, तुषार भद्रे, विश्वास शेडगे, प्रमोद इंगळे, जावेद खान , रिजवान सय्यद , प्रकाश वायदंडे, संजय कारंडे, गौरी आवळे, प्रशांत घाडगे, दिलीपकुमार चिंचकर, रामदास आडगळे, यांच्यासह अनेक पत्रकार यांनी आज विनम्र अभिवादन केले.

2) म्हसवड:-महामानवाला अभिवादनासाठी ज्येष्ठ अभियंता सुनील पोरे यांची ५० कि.मी.सायकलींग.

म्हसवड दि: येथील सामाजिक कार्यकर्ते व शिंपी समाज सातारा जिल्हाध्यक्ष
अभियंता सुनील पोरे यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त ५० किलोमीटर सायकलिंग करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन अभिवादन केले.
गेली १२ वर्षांपासून म्हसवड येथील शुभम भारत गॅस ऍजन्सीचे सर्वेसर्वा सामाजिक कार्यकर्ते अभियंता पोरे हे दरवर्षी आंबेडकर जयंती दिनांक १४ एप्रिल रोजी गोंदवले बुद्रुक, १० डिसेंबर शिखर शिंगणापूर श्रावणातील पहिल्या आठवड्यात पंढरपूर येथे सायकल चालवण्याचा छंद जोपासला आहे. सातारा जिल्हा परिषदेमध्ये अभियंता म्हणून त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले आहे.
या ही वर्षी त्यांनी ६५ व्या वर्षी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त मंगळवार दि.१४ रोजी सकाळी ५ वाजता घरापासून सायकलिंग सुरू करून दिड तासात गोंदवले येथे पोहचुन तेथील जयभीम युवक ऑर्गनायझेशन आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहिले . त्यानंतर महामानव बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन अभिवादन केले.व नंतर पुन्हा सकाळी ७ वाजता गोंदवले ते सव्वातासात म्हसवडला पोहोचले.
श्री .पोरे यांच्या या ५० किलोमीटर सायकल चालवून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याच्या उपक्रमाचे बौद्ध समाजासह सर्व समाज बांधवांनी कौतुक केले आहे. अभियंता सुनील पोरे यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून समाजसेवेची चुणक दाखवली आहे. सर्व जाती धर्माच्या युगपरुषांचे विचार आत्मसात करून सर्व धर्म समभाव ते मानत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने संविधानाचेच ते पालन होत असल्याचे ते मानतात. यावेळी त्यांच्यासमवेत जेष्ठ पत्रकार पोपट बनसोडे हे सुद्धा सहभागी झाले होते.

3) सातारा:-साताऱ्यात डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त दारू दुकान बंदीच्या निर्णयाचे स्वागत…

सातारा दि: संपूर्ण जगभर महामानव घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135 जयंती धूमधडाक्यात साजरी होत आहे. अनेक विधायक उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये काही समाज कंटक व विघ्न संतोषी नशापान करतात. त्यांना आळा घालण्यासाठी सातारचे जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील अधिकृत दारू दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. खऱ्या अर्थाने संविधानाचे रक्षण होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहे.

याबाबत सातारा पोलीस अधीक्षक यांचे पत्र क्रमांक जिविशा-३/डॉ आंबेडकर जयंती / २०२६ १७६५ सातारा दिनांक सात एप्रिल २०२६ रोजी क्रमांक :- बीपीए ११२०२६/व लि.आदेश सातारा, दिनांक १० एप्रिल २०२६.मुंबई मद्य निषेध कायदा १९४९ मधील कलम १४२ (१) मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी याना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर केला आहे.या नुसार आदेश देण्यात येतात की.डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी म्हणजे दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी सातारा जिल्हयातील सर्व देशी दारू किरकोळ विक्री (सीएल-३) विअर विक्री परवाने (एफएल / बीआर-२). विदेशी मद्य विक्री (एफएल-२), परवानाकक्ष (एफएल-३), बिअरबार (फॉर्म ई) व ताडी दुकान टिडी-१ या अनुज्ञप्तीची जागा व विक्री पुर्णपणे बंद ठेवण्याच्या आहेत.
सदर आदेशाचे कोणत्याही अनुज्ञप्तीधारकाने उल्लघन केल्यास त्यांचे विरूध्द मुंबई मद्य निषेध कायदा १९४९ व त्या अंतर्गत असलेल्या नियमान्वये योग्य ती कडक कारवाई केली जाईल. तसेच अनुज्ञप्ती वदच्या कालावधीची नुकसान भरपाई दिली जाणार नाही, याची नोंद घ्यावी. असे सातारचे जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील यांनी परिपत्रक काढले आहे.
हे परिपत्रक सर्व संबंधित अनुज्ञप्तीधारक (मार्फत संबंधित निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सर्व कार्यकारी अकार्यकारी निरीक्षक/दु, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सातारा यांना माहिती व पुढील कार्यवाहीस्तव अग्रेषित.
त्यांना निर्देशित करण्यात आले आहे.येते की, सदर आदेशाची प्रत सर्व संबंधितास देऊन त्यांच्या अधिपत्याखालील सर्व स्टाफसह कार्यक्षेत्रात गस्त घालून सदर आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल याची दक्षता घ्यावी. असेही सूचित केले आहे. दरम्यान या बाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशाचे पालन जर कोणी केले नाही तर याबाबत कोणतेही दया माया दाखवू नये. तसेच शासकीय ज्यांच्यावर जबाबदारी आहे. त्यांनी जबाबदारीचे पालन न केल्यास त्यांच्यावरही कडक कारवाई करावी. अशी मागणी अँड संजय गायकवाड, नितीन कांबळे, अजित जगताप व फुले शाहू आंबेडकरी विचाराचा वारसा जपणाऱ्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button