पुणे :-निगडी -भक्ती-शक्ती चौकामध्ये अनेक ठिकाणी पाणी गळतीने हजारो लीटर पाणी वाया.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी :-9767275783

भक्ती-शक्ती चौकामध्ये अनेक ठिकाणी
पाणी गळतीने हजारो लीटर पाणी वाया.
पुणे, निगडी, दि. 12 (शफिक शेख)ः- दिवसेंदिवस पाण्याची तुटवडा वाढत असताना आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना पाणीकपातीस सामोरे जावे लागत असताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे भक्ती शक्ती चौकामध्ये अनेक ठिकाणी पाण्याची व्हॉल्व्हमधून पाणी गळतीमुळे हजारो लीटर पाणी वाया जात आहे.
मा. आयुक्तांकडून नागरिकांना पाणी बचतीविषयी सजग केले जात असताना त्यांच्या पाणी विभागाच्या कामातील कुचराईमुळे पाण्याचे व्हॉल्व्हमधून हजारो लीटर पााणाी वाया जात आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते विजय वाघमारे आणि संजय हिरे यांनी सारथीवर तक्रार करूनही त्यांना काही प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
सदर व्हॉल्व्हमधून वाया जाणा-या हजारो लीटर पाण्यास पाहून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. आता तरी संबंधित विभागाने त्वरित कामास लागून आपल्या आयुक्तांच्या पाणी बचतीच्या आवाहनाला पूर्ण करण्यास पुढे यावे अशी आशा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.