आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-“योग ही आनंदी जीवनाची गुरुकिल्ली” – मा. प्रवीण महांगडे-किसन वीर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा.

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

वाई: दि. 21
“योग ही आनंदी जीवनाची गुरुकिल्ली” – मा. प्रवीण महांगडे-किसन वीर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा.

 

वाई येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ‘योग प्रशिक्षण व मार्गदर्शन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. निवृत्त पोलिस अधिकारी प्रवीण महांगडे यांनी विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण दिले. प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. याप्रसंगी प्रा. (डॉ.) ज्ञानदेव झांबरे, प्रा.(डॉ.) विनोद वीर, कार्यक्रम अधिकारी डॉ. अंबादास सकट, डॉ. संग्राम थोरात, पोलिस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षणाचे प्रशिक्षक विशाल महांगडे यांची उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ किंवा बुके देऊन न करता, जनता शिक्षण संस्थेचे विश्वस्त, संस्थापक सदस्य व माजी अध्यक्ष आदरणीय प्रतापराव भोसले (भाऊ) यांच्या जीवन व कार्याची माहिती देणारे व नुकतेच प्रकाशित झालेले ‘आठवणीतील भाऊ’ हे पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आले.
प्रवीण महांगडे म्हणाले, योग ही आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे. प्रत्येकाने आपल्या आरोग्यासाठी योगासने करणे आवश्यक आहे. योगामुळे शरीराबरोबरच मनही सशक्त होते आणि सकारात्मक ऊर्जा तयार होते. त्यांनी कपालभाती, भ्रामरी, अनुलोमविलोम या प्राणायाम आसनांबरोबरच मत्स्यासन, मंडुकासन, सर्वांगासन, भुजंगासन, ताडासन व सूर्यनमस्कारांचीही माहिती दिली.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले, दररोज योगा केल्यामुळे शरीर लवचिक बनते. मन प्रसन्न रहाते. दिवसभर थकवा जाणवत नाही. शारीरिक व मानसिक क्षमता वाढते.
कार्यक्रम अधिकारी डॉ. अंबादास सकट यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले, डॉ. संग्राम थोरात यांनी आभार मानले.
कार्यालय प्रमुख बाळासाहेब टेमकर, डॉ. संदीप वाटेगावकर, जितेंद्र चव्हाण, ॠषिकेश शिंदे, संपत जमदाडे, दत्तात्रय जाधव यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
योग प्रशिक्षणात महाविद्यालयातील विद्यार्थी, कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील डॉ. मंजुषा इंगवले, संदीप पातुगडे, प्रवीण मोरे, शशांक निकुंभ, दशरथ पवार, उमेश आडुळकर, दत्तात्रय शिंदे, एन. डी. नदाफ हे शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी, एन.एस. एस. चे स्वयंसेवक, पोलिस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी रोहन मालुसरे, प्रणव आवळे, जयेश देव, प्रेरणा सकट, श्वेता धनावडे, सुहाना शेख, रेश्मा चव्हाण यांनी सक्रिय सहभाग घेतला.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button