कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-सातारा शहरात पुरेसा पेट्रोल व डिझेल साठा उपलब्ध असल्याने चिंता करू नये- रितेश रावखंडे.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

सातारा शहरात पुरेसा पेट्रोल व डिझेल साठा उपलब्ध असल्याने चिंता करू नये- रितेश रावखंडे.

सातारा दि: देशभर वाहतूक संघटनेने संप पुकारला असून त्याची तीव्रता वाढत आहे. ही जरी वस्तूस्थिती असली तरी सध्या सातारा शहरात प्रत्येक पेट्रोल पंपावर आवश्यक असणारा डिझेल व पेट्रोलचा साठा उपलब्ध आहे. आजच सायंकाळी सात वाजेपर्यंत आणखीन आठ ते दहा पेट्रोल डिझेल टॅंकर चे वाहतूक सातारा शहरात होईल. अशी माहिती सातारा शहर पेट्रोल डिझेल असोसिएशनचे पदाधिकारी व रेणुका पेट्रोल पंपाचे मालक रितेश रावखंडे यांनी दिलेले आहे.
कालपासून वाहतूक संघटनेचा संप सुरू झाल्यामुळे विविध वृत्तवाहिनी व वृत्तपत्रांमध्ये त्याबाबत माहिती येताच अनेक ग्राहकांनी आपल्या वाहनांमध्ये अतिरिक्त डिझेल व पेट्रोल भरण्याचा सपाटा लावलेला आहे. त्यामुळे सर्व पेट्रोल पंपावर वाहन चालकांची गर्दी दिसून येत आहे.
वास्तविक पाहता पेट्रोल व डिझेल पुरवठा करणाऱ्या कोणत्याही कंपनीचा कोणताही आंदोलनात व संप नाही. तर हा वाहतूक संघटनेने पुकारलेला संप आहे .त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर टँकर जरी उभे असलेले दिसत असले तरी सातारा शहरांमध्ये आवश्यक डिझेल व पेट्रोलचा साठा उपलब्ध आहे. आणि आणखीन आठ ते दहा टँकर आजच सायंकाळपर्यंत पोहच होणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची वाहन चालक व इतरांनी चिंता करू नये असे नम्र आवाहन रितेश रावखंडे यांनी केलेले आहे.
दरम्यान, याबाबत काही ग्राहकांशी बोलणं केले असता आम्हाला आमच्या नातेवाईकांकडून संप असल्यामुळे आपल्या वाहनांमध्ये पेट्रोल भरून घ्या. अशी सूचना आल्यामुळे आम्ही पेट्रोल भरण्यास आलेलो आहोत असे सांगितले.
वास्तविक पाहता दोन दिवस पुरेल एवढा साठा असूनही आम्ही आता पेट्रोल वाहनात भरलेला आहे. अशी माहिती काहींनी दिली आहे. तर काही ग्राहकांनी सांगितले की कामापुरतं आम्ही पेट्रोलचा वापर करत असल्यामुळे आम्हाला त्याची फारशी चिंता नाही. शेवटी जिल्हा प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्यास सज्ज असून काही वाहनांना पोलीस संरक्षण देण्याची तयारी दर्शवली असल्याचे समजते.

————————————–

फोटो -रेणुका पेट्रोल पंप येथे पेट्रोल भरण्यासाठी झालेली गर्दी व पेट्रोल मालक रितेश रावखंडे (छाया- अजित जगताप, सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button