कुडाळ:-जावळीतील माथाडी कामगारांच्या कारनाम्याला भाजप आमदारांचा हुक.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
जावळीतील माथाडी कामगारांच्या कारनाम्याला भाजप आमदारांचा हुक.
कुडाळ दि: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी खोऱ्यात खऱ्या अर्थाने कष्टकरी व माथाडी कामगारांनी श्रमातून प्रतिष्ठा मिळवली. आता माथाडी कामगारांच्या चळवळीतूनच मोठे ठेकेदार व धन दांडगे यांचा शिरकाव झाला आहे. जावळीतील कोलेवाडीचे दत्ताराम भालेघर तथा दत्तात्रय पवार यांच्या विरोधात थेट नागपूर भाजपचेच आमदार प्रवीण दटके यांनी तक्रार करून हुक लावले आहे. यामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
माथाडी कामगारांचे आराध्य दैवत दिवंगत अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांना हक्क व न्याय मिळवून दिलेला आहे. आजही खऱ्या अर्थाने मुंबईसारख्या शहरात माथाडी कामगारांचे हित पाहणारे नेते आहेत. आज माथाडी कामगार चळवळीत परप्रांतीयांचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झालेला आहे. त्यातच जावळीतील एका सुपुत्राने आलिशान बंगला आणि बागायती जमीन जुमला व आलिशान वाहनांचा ताफा निर्माण केल्यामुळे आज दत्तात्रय भालेघर तथा दत्तात्रय पवार सध्या तरी चांगलेच चर्चेत आले आहेत.
कोलेवाडी येथून उपजीविकेसाठी सातारा येथे माथाडी कामगार अनुभव घेतल्यानंतर मुंबईला गेलेले दत्ताराम भालेघर यांनी माथाडी कामगार चळवळीतूनच खूप मोठे साम्राज्य निर्माण केले आहे. जोडीला मद्य पुरवठा एजन्सी असल्याने अधिकृत व्यवसाय म्हणून त्याला मान्यताही मिळाली आहे. तर दुसऱ्या बाजूला बंगल्याच्या आवारात श्री विठुरायाची मूर्ती उभी केली आहे. असे काही लोक सांगतात.
तसं पाहिलं तर सातारा जिल्ह्यातील माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील, आमदार शशिकांत शिंदे, गुलाबराव जगताप, वसंतराव मानकुमरे अशी बरीच मंडळी कार्यरत आहेत. परंतु त्यांनाही अल्पावधीत जेवढे वैभव निर्माण करताना आले नाही.तेवढे वैभव एका माथाडी कामगार आणि धाडसी व व्यवसाय वाढीसाठी अभ्यास व्यक्तिमत्व असलेल्या दत्ताराम भालेघर यांनी करून दाखवले आहे. त्यांना राजकीय कोणतीही महत्वकांक्षा नाही. तरीही त्यांना राजकारणात ओढण्याचा प्रयत्न झाला आहे.
माथाडी कामगार कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी निलेश दाभाडे व इतर अधिकाऱ्यांना सुद्धा दोषी धरण्यात येऊन त्यांची भाजपचेच आमदार प्रवीण कटके यांनी पावसाळी अधिवेशनातच हा मुद्दा उपस्थित केला आहे.त्याची बरीच चर्चा सुरू झालेली आहे. यापूर्वी मुंबईतील पायधूनी पोलीस ठाण्यात श्री भालेकर यांच्या विरोधात दोन पॅन कार्ड काढल्याचा गुन्हा दाखल सुद्धा झाला असला तरी त्याबाबत अधिक माहिती मिळाली नाही.
नागपूरचे भाजप आमदार प्रवीण दटके यांनी मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे कारवाईची मागणी केल्यानंतर श्री भालेघर यांची मंत्री महोदयांनी एस.आय. टी. चौकशीची आदेश दिले आहेत. सदरची चौकशी भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांनीच करावी. त्यांच्याकडे पुरावे सादर केले जाईल असे आमदार दटके यांनी सांगितले. यापूर्वी नागपुरातील शिक्षक भरती घोटाळा नागपूरची दंगल याबाबतही त्यांनी आवाज उठवला होता.
जावळीचे सुपुत्र असलेल्या श्री भालेघर यांचे जावळी तालुक्यात फारसं नाव नाही. हुमगाव परिसरातील कोलेवाडी व पाचगणी नजीक भातेघर येथे त्यांचा बंगला व शेती आहे. श्री विठ्ठलाच्या मूर्तीने हा बंगला लक्षवेधी ठरला आहे.जावळी तालुक्यातील ह भ प दत्तात्रय महाराज कळंबे यांनी वारकरी संप्रदाय निर्माण केला आहे. त्यामुळे या ठिकाणी श्री विठ्ठल रखुमाई यांची पूजा नेहमी केली जाते. प्रत्येक गावात मंदिर आहे.
.अलीकडच्या वीस पंचवीस वर्षांमध्ये जावळी तालुक्यात माथाडी कामगार चळवळीतून काही मोजकी मंडळी झपाट्याने पुढे आले आहेत. या त्यांच्या वैभव संपन्न कारकीर्दीला आता कळत नकळत का होईना बदनामीचे गालबोट लागल्यामुळे चौकशीला सामोरे जावे लागत आहे. जावळीकर म्हणून अनेकांना खंत सुद्धा वाटू लागलेली आहे. दरम्यान, याबाबत श्री भालेकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजली नाही.