कराड:-(ओगलेवाडी)- यशवंत शिक्षण संस्था सदाशिवगडचे माध्यमिक विद्यामंदिर सदाशिव गड हजार माची येथे आषाढी दिंडी उत्साहात साजरी.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
यशवंत शिक्षण संस्था सदाशिवगडचे माध्यमिक विद्यामंदिर सदाशिव गड हजार माची येथे आषाढी दिंडी उत्साहात साजरी.
कराड (ओगलेवाडी ):- ओगलेवाडी ता. कराड येथील यशवंत शिक्षण संस्था सदाशिवगडचे माध्यमिक विद्यामंदिर सदाशिवगड हजारमाची येथे विद्यार्थी आषाढी दिंडीचे आयोजन शुक्रवार दि. 4/ 7/2025 रोजी केले होते यावेळी संस्थेचे सचिव श्री.डी. ए. पाटील सर तसेच प्राथमिक विद्यामंदिर वडगाव हवेली चे मुख्याध्यापक श्री. पवार सर उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे सचिव श्री. डी. ए. पाटील सर यांच्या हस्ते पालखीचे पूजन केले त्यानंतर हजारमाची गावातून दिंडी गावातील ज्योतिबा मंदिर या ठिकाणी गेली सर्व विद्यार्थ्यांनी अनेक अभंग भक्तीपर गीते सादर केली.दिंडीचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पानवळ मॅडम शाळेचे सर्व शिक्षक पोळ मॅडम ,पाटील मॅडम, शिनगारे मॅडम., जगताप मॅडम, तसेच राजमाने सर, वेताळ सर ,गोसावी सर ,यांनी केले. तसेच मोहिते सर अशोक मोरे ,ओंकार रांगोळे या सर्वांनी सहकार्य केले अशाप्रकारे आषाढी दिंडी उत्साहपूर्ण वातावरणात आनंदात पार पडली.