ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

औरंगाबाद मध्ये बालकामगार दिनाची जनजागृती.

प्रतिनिधी :- गजानन काळे औरंगाबाद

औरंगाबाद मध्ये बालकामगार दिनाची जनजागृती* दि. 12जून 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय,बाल कामगार उपायुक्त कार्यालय व चाईल्ड लाईन मराठवाडा ग्रामीण विकास संस्था MGVS औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद मध्ये जागतिक बाल कामगार विरोधी दिन व बाल कामगार निर्मूलन सप्ताह 12 जून 2022 ते 20जून 2022 निमित्ताने रॅली व लाऊड स्पीकर च्या माध्यमातून क्रांती चौक, पैठण गेट ते गुलमंडी,सिटी चौक, या मुख्य मार्केट परिसरात 14 वर्षा खालील बालके यांना कामासाठी ठेऊ नये हा गुन्हा आहे आणि बालकामगार काम करताना आढळून आल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याबाबत जनजागृती करण्यात आली तसेच नागरिकांना खरेदी च्या वेळी, अथवा कोणत्याही ठिकाणी बाल कामगार आढळून आल्यास 1098 चाईल्ड हेल्प लाईन नंबर वर कॉल करून माहिती दयावी असे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी आदरणीय श्री चंद्रकांत राऊत कामगार उपायुक्त विभाग औरंगाबाद, श्री युवराज पडियाल सहाय्य्क कामगार आयुक्त, श्री गजानन बोरसे,सहाय्य्क कामगार आयुक्त,श्री गोविंद गावंडे शासकीय अधीक्षक, श्री विजय काजे, शॉप इन्स्पेक्टर, कामगार विभाग,विठ्ठल वैद्य,महेंद्र अंकुश,शॉप इन्स्पेक्टर,शिवाजी ढगे,चाईल्ड लाईन MGVS अन्नपूर्णा ढोरे, समुदेशक यशवंत इंगोले,टीम मेम्बर योगेश उगले यांची प्रमुख उपस्थिती होती,
तसेच आज विद्यादीप मुलींचे शासकीय बालगृह, छावणी औरंगाबाद येथे जिल्हा महिला व बाल विकास विभाग औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आदरणीय श्री संजय कदम, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा नोडेल अधिकारी, बाल कामगार निर्मूलन सप्ताह यांच्या संयुक्त विद्यमाने बाल कामगार विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button