औरंगाबादः-शिव संवाद यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत अतिरिक्त वाढ
प्रतिनिधी अमोल चव्हाण गंगापूर:-7397937231

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
औरंगाबादः-आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे ज्या ठिकाणी संवाद आणि मेळावे होतील त्या ठिकाणी स्थानिक पोलिसांकडून अतिरिक्त सुरक्षा पुरवली जाणार आहे आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा सुरू असून मंगळवारी वैजापूर तालुक्या महालगाव मध्ये त्यांची सभा सुरू असताना काही लोकांनी गोंधळ घातला होता तर आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे यांची गाडी देखील वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता सोबतच आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला होता त्यामुळे या सर्व प्रकाराची दखल पोलिसांकडून घेण्यात आली आहे यापुढे आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रेदरम्यान अतिरिक्त पोलीस असणार असून ज्या ठिकाणी संवाद आणि मिळावे होतील त्या ठिकाणी स्थानिक पोलिसांकडून अतिरिक्त सुरक्षा पुरवली जाणार आहे