आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-महिला पत्रकारितेचा बुलंद आवाज ! वाई तालुक्यात सारिका गवते व रेखा येवले यांचा सन्मान – ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनचा प्रेरणादायी उपक्रम.

पत्रकार अनिल वाडकर सातारा जिल्हा संघटक

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

महिला पत्रकारितेचा बुलंद आवाज !
वाई तालुक्यात सारिका गवते व रेखा येवले यांचा सन्मान – ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनचा प्रेरणादायी उपक्रम.

वाई / प्रतिनिधी :
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनच्या वतीने वाई तालुका महिला अध्यक्ष पत्रकार सारिका गवते यांना बूम प्रदान करून विशेष सन्मान करण्यात आला. तसेच महिला पत्रकार रेखा येवले यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम गवते मॅडम यांच्या ज्ञानसागर बंगल्यावर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या प्रसंगी ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संपादक मा. श्री. प्रल्हाद चव्हाण यांनी उपस्थित पत्रकार बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले. पत्रकारितेचे बदलते स्वरूप, भविष्यातील संकल्प, संघटनात्मक मजबुती तसेच पत्रकारांना आर्थिक उत्पन्नाच्या विविध संधी कशा उपलब्ध करून देता येतील याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
पत्रकार प्रतिनिधींना येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाययोजना आणि पत्रकारांच्या हक्कासाठी संघटितपणे कार्य करण्याची गरज यावरही यावेळी चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमास पत्रकार यशवंत जानकर, पत्रकार अनिल वाडकर, पत्रकार नित्यानंद मोरे, पत्रकार दीपक जाधव, महिला पत्रकार रेखा येवले, पत्रकार संतोष सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार सारिका गवते यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून वाई तालुक्यात आपला वेगळा ठसा उमटवला असून महिला पत्रकार म्हणून त्यांनी घेतलेला पुढाकार प्रेरणादायी असल्याचे मत राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण यांनी व्यक्त केले. तसेच महिला पत्रकार रेखा येवले यांच्या पत्रकारितेतील कार्याचेदेखील कौतुक करण्यात आले.
RPS STAR NEWS च्या माध्यमातून महिला पत्रकार सशक्तपणे पुढे येत असल्याचा अभिमान व्यक्त करत दोन्ही महिला पत्रकारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
“निर्भीड पत्रकारिता, संघटित शक्ती आणि महिलांचे नेतृत्व — हाच नव्या पत्रकारितेचा खरा चेहरा !”

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button