आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरेगाव:-श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी.

पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी.

 

आज आमच्या आश्रमशाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ.भारती मोहिते मॅडम यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारीत माहितीपर भित्तिपत्रिकेचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यानिमित्ताने साहिल हंडाळ, श्रेया शिंदे, अंजली सरोदे, प्रियांका चव्हाण या विद्यार्थ्यांनी भाषणे केली.

उपशिक्षिका श्रीमती सरिता सावंत यांनी *अज्ञात महात्मा गांधी* या पुस्तकातील प्रसंगाचे वाचन केले.

उपशिक्षक श्री.रमेश घोलप सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महात्मा गांधीजी यांच्या जीवनकार्याविषयी माहिती सांगितली. अहिंसात्मक मार्गाने स्वतंत्र मिळू शकते या संकल्पनेला मूर्त स्वरूप आणून देणारे महात्मा गांधीजी यांचे अनेक प्रसंग सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ. भारती मोहिते मॅडम होत्या. त्यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महात्मा गांधीजींचे स्वच्छता आणि स्वावलंबन याविषयीचे विचार सांगितले.आपल्या जीवनामध्ये त्यांच्यातील एकतरी गुण अंगीकारावा यासाठी आवाहन केले. यावेळी मोहिते मॅडम यांनी गायलेल्या *वैष्णव जनतो* या भजनाने वातावरण चैतन्यमय झाले.

यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.दीपक माने सर, श्री.रविंद्रनाथ मोहिते सर, श्री.संतोष जाधव सर, श्री.अशोक मोहिते सर, सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button