कराड :-ओबीसी आरक्षण मिळाले, कराडात ओबीसी समाजाकडून साखर वाटप….
प्रतिनिधी:- अभिजीत बल्लाळ कराड :-8421223931

कराड :-ओबीसी आरक्षण मिळाले, कराडात ओबीसी समाजाकडून साखर वाटप….
कराड दि.20-(प्रतिनिधी) ओबीसी आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या बाटिया आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्टाने स्वीकारल्याने ओबीसी समाजाला होऊ घातलेल्या निवडणुकीत 27 टक्के आरक्षण लागू झाल्याने आज कराड शहरात ओबीसी समाज बांधवांच्या कडून जल्लोष साजरा करण्यात आला.
येथील दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकानजीक नागरिकांना साखर वाटून फटाक्यांची आतषबाजी करून हा आनंद उत्सव साजरा करण्यात आला. समाजातील ज्येष्ठ नेते नंदकुमार बटाणे, भानुदास वास्के, दत्तात्रय तारळेकर, सचिन गायकवाडसर, रवींद्र मुंढेकर, संदीप मुंढेकर,नवाज सूतार, माणिक बनकर ,वैभव हिंगमिरे, अक्षय कूरकूले,भरत झेंडे, प्रकाश वास्के,तसेच ओबीसी संघटनेचे सर्व पदाधिकारी, समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.