ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
ब्रेकिंग न्यूज :-एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री , देवेंद्र फडणवीस यांची घोषणा….
प्रतिनिधी :- आशुतोष चव्हाण :-73786 19519

मुंबई दि.30-एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, आज संध्याकाळी 7.30 वाजता शपथविधी होणार,” अशी घोषणा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत केली.
सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतील अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर जिल्ह्यात विशेष करून शिंदे यांच्या गावात जल्लोष करण्यात येत आहे. ही माहिती कळताच सोशल मीडियावर जोरदार एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन होऊ लागले आहे