ताज्या घडामोडी
श्रीरामपूर:-22 जानेवारीला पालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली मान्यताप्राप्त )
22 जानेवारीला पालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार.
श्रीरामपुर ( RPS स्टार न्युज ) येत्या 22 जानेवारी रोजी गेल्या अनेक वर्षापासून सर्वोच्च न्यायालयात पेंटिंग असलेला पालिका निवडणुकीचा विषय मार्गी लावण्याची दाट शक्यता आहे कारण नुकतेच झालेल्या शिर्डी येथील पक्षीय अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा विषय सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले होते .
त्यामुळे 22 जानेवारी यासंदर्भात याचिकांवर जी सुनावणी होणार आहे ती शेवटची सुनावणी करण्याची अतिशय दाट शक्यता आहे .त्यानंतर लगेचच पालिका / पं . स . ZP . निवडणुकीच्या तारखा राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित केल्या जातील साधारण एप्रिल / मे मध्ये या निवडणुका होतील असा अंदाज आहे.