वाई:- बावधनची शान धुर्वीचा मानकरी हरपला.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR
वाई दि 4
श्री नाथ साहेबांचं मानाचं गाव बावधन आणि त्याच बावधन गावच्या नाथ साहेबांच्या बगाडाच्या रथाची परंपरा आजही अबाधित आहे त्याच रथाला बावधन करांच्या बैलांची एक चुरसच लागलेली असते आज पर्यंत लाखो हजारो बैलांनी या रथाला ओढण्यासाठी आपले तन मन अक्षरशः पिळवटून एकजुटीने अगदी थाटामाटात मान मिळवत ही परंपरा अबाधित ठेवली असाच एक धुर्वीचा मानकरी बावधन करांची शान म्हणजेच हिरा की जो आला की अगदी थाटामाटातच येत असे आणि तो ज्या बाजूला जुंपला जायचा त्या धूर्वीच्या बाजूला खाणसा धरण्याची किमया ही एक आगळी वेगळीच परवणी होती आज पर्यंत त्याने गेली 17 ते 18 वर्ष नाथसाहेबांचा रथ ओढून त्यांची मनोभावे सेवा करत होता. अशा हिऱ्याला आज देवाज्ञा झाली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिरा गेल्याचे दुःख लोक व्यक्त करत आहेत.तुझ्यासारखे पुन्हा होणे नाही आपल्या नावाला शोभेल असं काम करणारा सर्व महाराष्ट्राचा खिल्लार प्रेमी आणि नाथ साहेबांच्या भक्तांच्या मनात अधिराज्य गाजवणारा गिरी गोसावी यांचा असा हा हिरा
या जन्मात येऊन नाथाची आणी सोनजाई देवीची सेवा करून आपल्या आयुष्याच सोन केलंस तु हिरा . जसा एखादा हिरा चमकतो तसाच तु चकमत राहिलास हजारो भाविक बगाड यात्रेला येतात पण ते तुला पहिल्या शिवाय तुजा धुर्वीचा खेळ पहिल्या शिवाय माघारी परतत नाही . हिच तुजी ओळख . मालकाने तुज हिरा नाव ठेवलं ते तु शेवटच्या श्वासापर्यंत नव कमावलस .
भावपूर्ण श्रद्धांजली हिरा 💐🥺