वाई:-पशुखाद्य निर्मितीतून किकली ग्लोबल फार्मर प्रोडूस ठरले सकस आहाराचे केंद्र…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पशुखाद्य निर्मितीतून किकली ग्लोबल फार्मर प्रोडूस ठरले सकस आहाराचे केंद्र…

वाई दि: पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्रातून मोठी चळवळ उभी राहिली. साखर कारखाने दूध संघ त्याचबरोबर सहकारी सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला समृद्ध करण्यात आले. अल्पभूधारक व पशुधनावर ज्यांचे जीवनमान आहे. अशा पशुपालक शेतकऱ्यांसाठी सातारा जिल्ह्यातील किकली तालुका वाई या ठिकाणी किकली ग्लोबल फार्मर प्रोडूसर कंपनीच्या माध्यमातून धवल क्रांतीला हातभार लावणारे पशुखाद्य निर्माण करण्यात आले आहे. या कंपनीमुळे खऱ्या अर्थाने मुक्या जनावरांनी ही धन्यता मानली आहे.
सहकार क्षेत्रातील इतर एफ पी ओ साठी प्रेरणादायी मॉडेल किकली ग्लोबल फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचा पशुखाद्य कारखाना हा केवळ एक उद्योग
नसून, “शेतकरी एकत्र आले तर काय साध्य करू शकतात? याचे जिवंत उदाहरण आहे.
हा उपक्रम राज्यातील व देशातील इतर शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल. अशी यशोगाथा आहे.
पूर्वीच्या काळी प्रत्येक खेड्यापाड्यात स्थानिक पशुपालक व शेतकऱ्यांसाठी मुबलक प्रमाणात गायरान जमीन व मोकळा परिसर आणि डोंगर असल्यामुळे मुबलक प्रमाणात खाद्य उपलब्ध होत होते. आता त्यानंतर मोठ्या प्रमाणात धरण व बंधारे आणि विकास कामांसाठी वास्तू उभे राहिल्यामुळे शेत जमीन कमी होऊ लागली. ज्यांच्या दावणीला पशु होते. त्या ठिकाणी तीन गाई म्हशी सुद्धा नवलाईचा विषय ठरला आहे. उसाचे वाढे खरेदी करताना ऊस परवडला पण वाढे परवडत नाही. असे म्हणण्याची पाळी आलेली आहे. त्यावर उपाययोजना म्हणून ग्रामीण भागातील सातारा जिल्ह्यात किकली ग्लोबल फार्मर प्रोड्यूसर कंपनी’ पशुखाद्य कारखान्यातून शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण जुळवण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आलेला आहे. प्रत्येक उपयुक्त जनावरांची तपासणी व त्यांच्या जीवनमानाचा अभ्यास करून त्यांना आवश्यक असणारा सकस आहार उपलब्ध व्हावा. त्यांचे गुणवत्ता व दर्जेदार दूध वाढीस लागावे. या भावनेतूनच या कंपनीची निर्मिती करण्यात आलेली आहे. आपल्या मुलाप्रमाणे पशुधन जतन करणाऱ्या शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सहकाराचा मानबिंदू असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नेहमीच सहकार्याचा हात पुढे केलेला आहे. त्यामुळेच तर किकली गावच्या माळावर पशुखाद्याचे नंदनवन फुलून गेले आहे. एकमेका सहाय करू अव्यय धरू सुपंथ याप्रमाणे सध्या सहकारी चळवळीला विश्वास व प्रेरणा देणाऱ्या किकली ग्लोबल फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ने अल्पावधीमध्येच आपली गुणवत्ता राखून पशुखाद्य संस्कृतीमध्ये चळवळ उभी केलेली आहे.
आज महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा, अशा राज्यातही या कंपनीच्या पशुखाद्यासाठी मागणी होऊ लागलेली आहे. जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि पशुखाद्यांसाठी आवश्यक असणाऱ्या जीवनसत्वाने भरलेल्या आहारातूनच नैसर्गिकरीत्या पशु आहार उपलब्ध केला जात आहे. पशुखाद्य आहार निर्मितीसाठी आवश्यक असणारे सर्व पोषक वातावरण तयार करण्यासाठी विशेष भर दिला जात आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पाचगणी, महाबळेश्वर, वाई ,पाटण जावळी या ठिकाणी तसेच दुष्काळी भागातील माण ,खटाव, फलटण, कोरेगाव सारख्या तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पशुखाद्याची मागणी वाढू लागलेली आहे. ग्रामीण भागातील अर्थकारण सदृढ व निकोप करण्यासाठी शेतकऱ्याचे जीवनमान हे शेतीवर व पशुधनावर अवलंबून आहे. याचा अभ्यास करूनच या पशुखाद्याची निर्मिती झाली असली तरी आधुनिक तंत्रज्ञान युक्त आत्मनिर्भर भारत ह्या संकल्पनेतूनच हे मोठे आव्हान पेलले आहे.
पशुखाद्य साठी आवश्यक असणाऱ्या घटकाचे प्रमाण निश्चित करून, उच्च दर्जाचे संतुलित खाद्य (कॉन्सन्ट्रेट, मॅश, मिनरल मिक्सचर इ.) उत्पादित केले जाते. खाद्यातील प्रथिने, चरबी, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे सामाजिक-आर्थिक प्रभाव पाहूनच पशुखाद्य निर्मिती आणि त्यासोबत ग्रामीण रोजगार उपलब्ध झाल्यामुळे दुहेरी यश मिळाले आहे. पूर्वी जनावरांना रानात खाद्य चरण्यासाठी सोडले जात होते. त्यानंतर दावणीला बांधून मायमाऊली त्या गाई म्हशीच्या दुधाची धार काढून ते डेअरीला पोचवले जात होते. यामध्ये संपूर्ण कुटुंबाचा सहभाग होता. आता पशुखाद्य उपलब्ध झाल्यामुळे नैसर्गिक संकटातही मुक जनावरांना आवश्यक खाद्य मिळत असल्याने
खऱ्या अर्थाने जनावरांना सुद्धा सुख सुविधा उपलब्ध झालेले आहेत. एक प्रकारे मुक्या जनावरांसाठी चारा घरपोच देणारे झोमॅटो झाल्याचे विनोदाने बोलले जात आहे. शेती उत्पादनातून झालेल्या या पशुखाद्यामुळे शेतकऱ्यांनाही दुहेरी फायदा होत आहे.
सातारा जिल्ह्यातील किकली ग्लोबल फार्मर प्रोड्युसर कंपनी ही आता शेतकऱ्यांसाठी आवश्यक बाब ठरली आहे. प्रत्येक घरामध्ये ज्या ठिकाणी पाळीव शेतीशी निगडित जनावरे आहेत. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी एक प्रकारे हा प्रकल्प ‘आत्मनिर्भर भारत’ आणि
‘दुग्धशक्ति’ या राष्ट्रीय स्वप्नांना साकार करण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक यशस्वी पाऊल ठरले आहे याचा आता सर्वांनाच अभिमान वाटत आहे.
सातारा जिल्हयातील दक्षिण काशी समजणाऱ्या वाई तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी चांगले उपक्रम राबवले आहेत. यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची अर्थवाहिनी ठरली आहे. जिल्ह्यातील गरजवंत व शेतीमध्ये नवीन प्रयोग करणारे हजारो शेतकरी आणि पशुपालक कुटुंबांच्या आर्थिक भविष्यासाठी ही किकली ग्लोबल फार्मर प्रोड्युसर कंपनी सहकारी प्रयोगशाळा वाटत आहे. अनेक देश विदेशातील पर्यटक सुद्धा या ठिकाणी येऊन या नवीन तंत्रज्ञान व पशुखाद्यबाबत
माहिती घेत आहेत. किकली ग्लोबल फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचा पशुखाद्य कारखाना एफ पी ओ मॉडेल, पशुखाद्य उद्योग या सर्व बाजूने गुणवत्ता सिद्ध केल्यामुळे संतुलित पशु खाद्य निर्मितीमध्ये अग्रस्थानी पोहचली आहे.
नैसर्गिक वरदान लाभलेल्या वाई तालुक्यामधील किकली गावात त्याचबरोबर परिसरात भविष्यात-उत्पादन क्षमतेत वाढवणे
नवीन पशुखाद्य प्रकार मुक्या जनावरांसाठी उपलब्ध करणे. खास बाब म्हणून जनावरांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करणे.थेट बाजारपेठ विस्तार डिजिटल व्यवस्थापन प्रणाली अशा अनेक टप्प्यांवर काम करण्याचा कंपनीचा मानस आहे. नवीन वर्षाच्या नवीन संकल्पना लवकरच जाहीर होणार असून या कंपनीच्या पशुखाद्याने सातारा जिल्ह्यातील कंदी पढे
जसे प्रसिद्ध आहे तशा पद्धतीने आता त्या कंपनीच्या पशुखाद्याच्या ब्रँड निर्माण झाला असल्याची माहिती शेतकरी देत आहेत.




